खेळ जगतात ‘फिटनेस’ अत्यंत महत्त्वाची असते. मग तो कुठलाही खेळ असो. आंतरराष्ट्रीय स्तरावर फिटनेसचे अत्यंत महत्त्व असते. क्रिकेटमध्ये तर गेल्या काही वर्षात निव्वळ फिटनेसच्या कारणामुळे अनेक खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे खेळाडू आहेत, जे आपल्या वजनदार शरीरयष्टीमुळे चर्चेत राहिले आहेत. जाणून घेऊया कोण आहे ते खेळाडू?
राहकीम कॉर्नवाल
वेस्टइंडीजचा अष्टपैलू राहकीम कॉर्नवॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात जास्त वजनदार खेळाडू आहे. 6 फूट उंचीच्या कॉर्नवॉलचे वजन 140 किलो आहे. वजन जास्त असले तरीही त्याने त्याचा खेळावर परिणाम होऊ दिलेला नाही. कॉर्नवॉलने 8 कसोटी सामन्यातील 13 डावात दोन अर्धशतकांच्या मदतीने 186 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेटही घेतल्या आहेत. त्याने दोन वेळेस एका कसोटी डावात पाच पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
वारविक आर्मस्ट्रॉंग
ऑस्ट्रेलियाच्या वारविक आर्मस्ट्रॉंगच्या नावावर तब्बल 117 वर्षे सर्वात जास्त वजनदार क्रिकेटपटू असल्याचा विक्रम होता. उत्कृष्ट अष्टपैलू असलेल्या वारविकचे वजन 133 किलो होते. त्याने 1902 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या 20 वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीत त्याने 50 कसोटी खेळले, त्यात 38.69 च्या सरासरीने 2863 धावा केल्या; तर गोलंदाजीत 87 विकेट्स घेतल्या होत्या.
ड्वेन लिवरॉक
ड्वेन लिवरॉक क्रिकेट इतिहासात सर्वात जास्त वजन असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. लिवरॉकने 2007 च्या विश्वचषकामध्ये रॉबिन उथप्पाचा उत्कृष्ट झेल टिपला होता. त्याने 32 वनडे सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत. आता तो बरमुडाच्या पोलीस सेवेत काम करतोय.
अर्जुन रनतुंगा
श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणारा अर्जुन रणतुंगा हा आपल्या वजनामुळे प्रसिद्ध होता. एकशे पंधरा किलो वजन असलेल्या अर्जुनने कारकिर्दीत 12561 धावा केल्या होत्या. तर 95 विकेट घेतल्या होत्या.
कॉलिन मिलबर्न
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 13 हजाराहून अधिक धावा बनवणाऱ्या इंग्लंडच्या कॉलिन मिलबर्नचे वजन 114 किलो होते. कॉलीनने 9 कसोटी सामन्यात 42.71 च्या सरासरीने 654 धावा केल्या होत्या. एका मोटर अपघातात त्याच्या डोळ्याला इजा झाली. त्यामुळे त्याची कारकीर्द संपुष्टात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचे ‘हे’ ३ शिलेदार भविष्यात घेऊ शकतात कर्णधार कोहलीची जागा
अद्भुत.. अविश्वसनीय! चेंडू आवाक्यात नसूनही डी कॉकने सूर मारत एकाहाती टिपला झेल, पाहा व्हिडिओ
युएई नव्हे तर ‘या’ देशात होणार टी२० विश्वचषकातील सुरुवातीचे ६ सामने, जाणून घ्या यामागचे कारण