---Advertisement---

आपल्या गोलंदाजीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणारे ५ भारतीय क्रिकेटर्स

On: रविवार, एप्रिल 26, 2020 10:00 AM
---Advertisement---

इंग्लंड हा जगातील असा एकमेव देश आहे जो १ हजारहुन अधिक कसोटी सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटला अतिशय महत्त्व देणारा देश म्हणून इंग्लंडकडे पाहिले जाते.

याच देशाबरोबर टीम इंडिया इतिहासातील पहिला कसोटी सामना खेळली होती. त्यामुळे या संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत अनेक भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यात भागवत चंद्रशेखर यांनी २३ सामन्यात तब्बल ९५ विके्टस घेतल्या आहेत.

ज्या गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध ५०पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत त्यात विनु मंकड यांची सरासरी सर्वोत्तम अर्थात २३.१२ आहे.

भागवत चंद्रशेखर यांनी तब्बल ८वेळा सामन्यात ५पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांत इशांत शर्मा व आर आश्विन यांनी प्रत्येकी ५६ विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारे ५ गोलंदाज
९५- भागवत चंद्रशेखर, सामने- २३
९२- अनिल कुंबळे, सामने- १९
८५- बिशन सिंग बेदी, सामने- २२
८५- कपिल देव, सामने- २७
५६- आर आश्विन, सामने- १५
५६- इशांत शर्मा, सामने- १७
५४- विनु मंकड, सामने- ११

ट्रेंडिंग घडामोडी-

-आयपीएलमध्ये ८ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव खेळाडू

-आता एबी-विराट खेळणार कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्त्वाखाली

-ज्या अकाऊंटवरुन धोनीला ट्रोल करण्यात आले तीच पोस्ट केली रिषभ पंतने लाईक

 

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment