भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश दोन्ही संघ (19 सप्टेंबर) रोजी पहिल्या कसोटी सामन्यासाठी आमने-सामने येणार आहेत. भारतासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणार आहे. पण या बातमीद्वारे आपण बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल माहिती पाहणार आहोत.
सचिन तेंडुलकर- क्रिकेट जगतातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तेंडुलकरनं बांगलादेशविरुद्ध 2000 पासून 2010 पर्यंत 7 सामने खेळले आहेत. 7 सामन्यांच्या 9 डावात त्यानं 5 शतकं झळकावली. बांगलादेशविरुद्ध तेंडुलकरनं एक द्विशतक देखील झळकावलं आहे.
राहुल द्रविड- भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडनं (Rahul Dravid) बांगलादेशविरुद्ध 2000 पासून 2010 पर्यंत 7 सामने खेळले आहेत. 7 सामन्यांच्या 10 डावात द्रविडनं 3 शतकं झळकावली आहेत. दरम्यान त्यानं 560 धावा केल्या आहेत.
विराट कोहली- भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं (Virat Kohli) बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्ध कोहलीनं आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 9 डावात त्यानं 2 शतक ठोकले आहेत. बांगलादेशविरुद्ध कोहलीनं एक द्विशतक देखील झळकावलं आहे.
गौतम गंभीर- भारताचा माजी दिग्गज खेळाडू अर्थात भारताचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) 2004 पासून 2010 पर्यंत बांगलादेशविरुद्ध 4 कसोटी सामने खेळले. 4 कसोटी सामन्यांच्या 6 डावात फलंदाजी करताना 2 शतक ठोकले आहेत. गंभीरनं कसोटीमध्ये बांगलादेशविरुद्ध 381 धावा ठोकल्या आहेत.
चेतेश्वर पुजारा- भारतीय संघाचा कसोटीमध्ये उत्कृष्ट असणारा खेळाडू चेतेश्वर पुजारा भारतीय संघापासून काही काळ दूर आहे. तत्पूर्वी पुजारानं बांगलादेशविरुद्ध 5 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 1 शतक झळकावलं आहे. या भारताच्या 5 खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया
“मी शाळेतही कधी सस्पेंड झालो नव्हतो”, ‘कॉफी विथ करण’मधील वादावर राहुलचं मोठं वक्तव्य
निवृत्त झाल्यानंतरही धवनचा दबदबा कायम! सेना देशात अशी कामगिरी करणारा एकमेव सलामीवीर