---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत खेळलेले ‘हे’ ५ भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर

On: शुक्रवार, फेब्रुवारी 5, 2021 6:59 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू सुरू झाली असून शुक्रवारी(५ फेब्रुवारी) पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या सामन्यासाठीच्या अंतिम ११ जणांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारताचा अंतिम ११ जणांचा संघ जेव्हा जाहीर केला, तेव्हा अनेकांना थोडा धक्का बसला. यात ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन विजयात सामील झालेल्या ५ खेळाडूंची नावे नव्हती. विराटने सांगितले की ५ खेळाडू हे भारतीय ११ जणांच्या संघात परतले असून यात त्याचासह जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि शहाबाज नदीम यांचा समावेश आहे.

या पाच खेळाडूंच्या पुनरागमनामुळे काही भारतीय खेळाडूंना बाहेर बसावे लागले आहे. यात मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि मयंक अग्रवाल यांचा समावेश आहे. तर टी नटराजनला विश्रांती देण्यात आली आहे आणि नवदीप सैनी दुखापतग्रस्त आहे; त्यामुळे या दोघही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश नाही.

सिराज, ठाकूर, अग्रवाल, नटराजन आणि सैनी हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे भाग होते. या सामन्यात भारताने विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन भूमीत सगल दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

भारत आणि इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ जणांचे संघ –

भारतीय संघ – 

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शहाबाज नदीम

इंग्लंडचा संघ –

रॉरी बर्न्स, डोमेनिक सिब्ली, डॅनीयल लॉरेन्स, जो रूट, बेन स्टोक्स, ऑली पोप, जॉस बटलर, डॉमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेन्स अँडरसन.

महत्त्वाच्या बातम्या –

रूटने भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले! केविन पीटरसन म्हणाला, “आज विराटला ‘या’ खेळाडूची नक्की आठवण येत असेल”

…म्हणून इंग्लंड संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान दंडाला बांधली काळी पट्टी

मैदानावर वेदनेने विव्हळत होता इंग्लंडचा कर्णधार, विराटने खिलाडूवृत्ती दाखवत जिंकली चाहत्यांची मने; पाहा कौतुकास्पद व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---