---Advertisement---

रोहितसह आयसोलेशनमध्ये असलेल्या खेळाडूंना सरावाची मुभा, पण आहे ‘ही’ एक अट

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 1:45 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील केवळ २ कसोटी सामने आता उरले आहेत. अशातच अनेक वाद निर्माण होत आहेत. नुकतेच मेलबर्नमध्ये ५ भारतीय क्रिकेटपटू एका हॉटेलमध्ये गेले असताना एका चाहत्याने त्यांचे त्यांच्या नकळत बिल भरले. त्यामुळे त्यांनी या चाहत्याची भेट घेतली. मात्र, या घटनेनंतर भारतीय क्रिकेटपटूंनी जैव सुरक्षित वातावरणाचा भंग केला आहे की नाही याचा तपास सुरु झाला. त्यामुळे या पाचही क्रिकेटपटूंना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंपासून दूर करण्यात आले.

हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या क्रिकेटपटूंमध्ये उपकर्णधार रोहित शर्मासह नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे. या खेळाडूंना अन्य खेळाडूंपासून वेगळे केले असले तरी हे क्रिकेटपटू तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सोमवारी(४ जानेवारी) सिडनीला भारतीय संघासहच रवाना झाले. मात्र यावेळी त्यांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे लागले.

पण आता असे समोर येत आहे की या खेळाडूंसाठी लावण्यात आलेले एकांतवासाचे नियम फार कठोर नाही. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी (३ जानेवारी) जेव्हा भारतीय संघाच्या सराव सत्रात पावसाचा व्यत्यय आला तेव्हा या खेळाडूंनी संघासहच जिममध्ये घाम गाळला.

भारतीय संघाच्या जवळ असलेल्या एका सुत्राने सांगितले की या खेळाडूंना केवळ मुलभूत सोशल डिस्टसिंगचे नियम पाळायला सांगितले आहेत. सुत्राने सांगितले की ‘संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाले नाही किंवा उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाले नाही. फक्त, सावधगिरी म्हणून या खेळाडूंना पहिल्यासारखे संघांमध्ये मिसळण्यास सांगितलेलं नाही. तपासासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही.”

भारताच्या या ५ खेळाडूंना सराव करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. फक्त यावेळी त्यांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळायला सांगितले आहेत. तसेच या ५ जणांपैकी रोहित, पंत आणि शुबमन हे तीन खेळाडू सिडनी कसोटीत खेळण्याचीही दाट शक्यता आहे.

त्याचबरोबर सिडनीला जाण्याआधी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत भारताचे सर्व खेळाडू आणि सहकारी कर्मचारी निगेटिव्ह आढळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“भारताला ब्रिस्बेनला जायचं नाही कारण ऑस्ट्रेलिया तिथे नेहमीच जिंकतो”, ऑसी क्रिकेटरचे खळबळजनक वक्तव्य

विलियम्सनचा शतकी तडाखा! स्टिफन फ्लेमिंगच्या ‘या’ विक्रमालाही दिला धक्का

केन विलियम्सनचा पुन्हा शतकी धमाका! ‘हा’ विक्रम करत विराटलाही टाकलंय मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---