fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताचे सर्वात यशस्वी ५ विकेटकिपर, ज्यांनी वनडेमध्ये घडवला आहे इतिहास

क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाची भूमीका महत्त्वाची मानली जाते. भारताकडून आत्तापर्यंत २४ खेळाडूंनी वनडेमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यातील केवळ एमएस धोनी आणि नयन मुंगिया यांनीच १०० पेक्षा अधिक सामन्यात यष्टीरक्षक केले आहे.

तसेच धोनी भारताचा एकमेव यष्टीरक्षक आहे ज्याने ३०० वनडे सामन्याहून अधिक सामन्यात यष्टीरक्षण केले आहे. तसेच तो आजपर्यंतचा भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहे. त्याच्याबरोबरच भारताच्या पहिल्या ५ यशस्वी यष्टीरक्षकांचा घेतलेला हा आढावा.

१. एमएस धोनी – 

मागील अनेक वर्षांपासून धोनीची दिग्गज यष्टीरक्षकांमध्ये गणना केली जाते. तो नेहमीच त्याच्या वेगाने केल्या जाणाऱ्या यष्टीचीतसाठी ओळखला जातो. त्याने आत्तापर्यंत यष्टीरक्षक म्हणून भारताकडून ३४७ सामने खेळले असून यामध्ये त्याने यष्टीमागेल ४३८ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये ३१८ झेल आणि १२० यष्टीचीतचा समावेश आहे. तो भारताकडून यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा यष्टीरक्षक आहे.

२. नयन मुंगिया –

धोनीच्या अगमनाआधी नयन मुंगियाने भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी बऱ्याचकाळ सांभाळली होती. त्यांनी १९९४-२००० या कालावधीत यष्टीरक्षण करताना भारताकडून १४० वनडे सामने खेळले. यात त्यांनी यष्टीमागे १५४ विकेट्स घेतले. यामध्ये त्यांनी ११० झेल आणि ४४ यष्टीचीत केले आहेत. ते भारताकडून यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

३. किरण मोरे –

८०-९० च्या दशकात ऍलेक स्टिवर्ट, इयान हेली हे जगात उत्तम यष्टीरक्षक म्हणून नावलौकिक मिळवत होते. त्याचकाळात भारताकडून मोरे यांनी भारताकडून यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी जवळजवळ १० वर्षे भारताकडून यष्टीरक्षक म्हणून खेळताना ९४ सामन्यात यष्टीमागे ९० विकेट्स घेतल्या. यामध्ये त्यांनी ६३ झेल आणि २७ यष्टीचीत केले. ते भारताकडून यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

४. राहुल द्रविड –

भारताकडून नयन मुंगिया संघातून बाहेर पडल्यानंतर राहुल द्रविडने काहीवर्षे यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली. संघात आणखी एका फलंदाजाला खेळता यावे म्हणून द्रविडने ही जबाबदारी स्विकारली होती. त्याने यष्टीरक्षक म्हणून ७३ वनडे सामने भारताकडून खेळताना ८४ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने ७१ झेल आणि १३ यष्टीचीतचा समावेश होता. तो भारताकडून चौथ्या क्रमांकाचा यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा यष्टीरक्षक आहे.

५. दिनेश कार्तिक –

धोनीच्या बरोबरीने दिनेश कार्तिकचीही आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरु झाली होती. पण धोनीने यष्टीरक्षक आणि त्याच्या फलंदाजीने संघात जागा पक्की केल्याने कार्तिकला तेवढी संधी मिळाली नाही. पण त्याने २६ वनडे सामन्यात भारताकडून यष्टीरक्षण करताना ४१ विकेट्स घेतल्या. त्याने ३४ झेल आणि ७ यष्टीचीत केले आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी महान क्रिकेटर दान करणार आपल्या मौल्यवान वस्तु

टाॅप ३- भारत व पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलेले ३ क्रिकेटपटू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १- पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

You might also like