fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टाॅप ३- भारत व पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलेले ३ क्रिकेटपटू

भारत हा असा एक देश आहे ज्यात मुले लहानपणापासूनच देशाकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळे भारताकडून अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळणे ही नेहमीच एक मोठी गोष्ट समजली जाते. अनेक देशांत क्रिकेटर हे दुसऱ्या देशातील काही नियमांच्या अधिन राहुन क्रिकेट खेळतात. इंग्लंडकडून अनेक दक्षिण आफ्रिका किंवा भारतीय वंशाचे क्रिकेटर क्रिकेट खेळले आहे. परंतु भारतात सहसा असे होत नाही.

भारत व पाकिस्तानकडून एकाच क्रिकेटरने क्रिकेट खेळणे तर केवळ अशक्यच वाटते. तरीही तीन क्रिकेटपटू असे आहेत ज्यांनी भारत व पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले आहे. पाकिस्तान देशाला स्वतंत्र्य झाल्यानंतर १९५२ साली कसोटी संघाचा दर्जा मिळाला. त्यानंतर हे क्रिकेटपटू आपल्या मायभूमी अर्थात पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले. तसेच सिनीयर नवाब ऑफ पतौडी हे इंग्लंड व भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले आहेत.

जगात केवळ १५ क्रिकेटपटू असे आहेत जे दोन देशांकडून कसोटी क्रिकेट खेळले आहेत. यातील ३ क्रिकेटपटू हे भारत व पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेट खेळले हे विशेष. या तीनही क्रिकेटपटूंचा जन्म हा लाहोर, पाकिस्तानचा आहे. List of cricketers who have played for two international teams.

३. आमीर इलाही

१ सप्टेंबर १९०८ रोजी आमीर इलाही यांचा जन्म पाकिस्तानधील लाहोर येथे झाला. बहवालपूर, बदोडा, मुस्लिम नाॅर्थन इंडिया, साऊंथर्न पंजाब अशा संघांकडून ते देशांतर्गत क्रिकेट खेळले. त्यांनी १२५ प्रथम श्रेणी सामने खेळले. १२ डिसेंबर १९४७ रोजी त्यांनी भारताकडून कसोटी पदार्पण केले व ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे एक कसोटी सामना खेळले.

पुढे १९५२-५३मध्ये पाकिस्तानला कसोटी संघाचा दर्जा देण्यात आला व ते पाकिस्तानकडून १९५२मध्ये ५ कसोटी सामने खेळले. हे पाचही सामने ते भारताविरुद्ध खेळले. भारताकडून १ कसोटी सामन्यात १७ धावा तर पाकिस्तानकडून ५ कसोटी सामन्यात ६५ धावा व ७ विकेट्स त्यांनी घेतल्या. ते भारताकडून कसोटी खेळलेले ४०वे तर पाकिस्तानकडून कसोटी खेळलेले पहिले क्रिकेटपटू ठरले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांचा कराची येथे मृत्यु झाला.

२. गुल मोहम्मद

१५ ऑक्टोबर १९२१ रोजी गुल मोहम्मद यांचा जन्म पाकिस्तानमधील लाहोर येथे झाला. ते मुस्लिम्स, नाॅर्थन इंडिया, बडोदा, हैद्राबाद यांच्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. २२ जून १९४६ रोजी वयाच्या २५व्या वर्षी त्यांनी भारताकडून इंग्लंडविरुद्ध लाॅर्ड्स येथे कसोटी पदार्पण केले.

ते भारताकडून कसोटी खेळणारे २७वे तर पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे २४वे क्रिकेटपटू ठरले होते.

२३ ऑक्टोबर १९५२ पर्यंत ते भारताकडून ८ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया देशात कसोटी सामने खेळले. ते केवळ एक कसोटी सामना पाकिस्तानकडून खेळले.  ते डावखुरे स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जात असे. बडोदाकडून खेळताना त्यांनी होळकरविरुद्ध ३१९ धावांची जबरदस्त खेळी केली होती. विशेष म्हणजे त्यांनी ही खेळी १९४६-४७च्या रणजी ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात केली होती. यावर्षी बडोदा संघ रणजी ट्राॅफी जिंकला होता व १९४५-४६च्या फायनला वचपा काढला होता.

१९५५मध्ये त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्विकारले व ११ ऑक्टोबर १९५६ रोजी ते आपला पहिला व शेवटचा सामना पाकिस्तानकडून खेळले. याच सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विजयी धाव घेतली होती. त्यांचा मृत्यु वयाच्या ७०व्या वर्षी १९९२मध्ये लाहोर पंजाब येथे झाला.

१. अब्दुल करदार

१७ जानेवारी १९२५ रोजी अब्दुल करदार यांचा जन्म पाकिस्तानमधील लाहोर येथे झाला. ते मुस्लिम्स, नाॅर्थन इंडिया, पाकिस्तान सेवादल यांच्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. २२ जून १९४६ रोजी वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी भारताकडून इंग्लंडविरुद्ध लाॅर्ड्स येथे कसोटी पदार्पण केले. भारताकडून ते तीन कसोटी सामने खेळले. हे तीनही सामने ते इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळले. ज्यात त्यांनी ४३, ०, १, ३५ व १ अशा धावा केल्या.

त्यांनी १७४ प्रथम श्रेणी सामन्यात २९.८३च्या सरासरीने ६८३२ धावा केल्या. त्यांना पाकिस्तान क्रिकेटचे पितामह समजले जाते. भारताकडून कसोटी खेळणारे ते २९वे तर पाकिस्तानकडून कसोटी खेळणारे ७ वे खेळाडू होते. ते पाकिस्तानकडून एकूण २३ सामने खेळले व त्या सर्व सामन्यात ते पाकिस्तानचे कर्णधार राहिले. यात त्यांनी ६ विजय, ६ पराभव व ११ सामने अनिर्णित राखले. गमतीचा भाग असा की जे आमीर इलाही व गुल मोहम्मद भारत व पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले ते पाकिस्तानकडून अब्दुल करदार यांच्याच नेतृत्त्वाखाली क्रिकेट खेळले. १९९६ साली इस्लामाबाद, पंजाब येथे वयाच्या ७१व्या वर्षी अब्दुल करदार यांचा मृत्यु झाला. Three cricketers who represented both India & Pakistan.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like