आयपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. प्रत्येकजण या शानदार स्पर्धेच्या प्रतीक्षेत होता. कोरोना महामारीमुळे आयपीएलचे हे सत्र आखाती देशात पार पडणार आहे. भारतीय व अव्वल विदेशी क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये आपले कौशल्य दाखवत असतात.
या स्पर्धेत अनेक पुरस्कार खेळाडूंना दिले जातात. पण ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ पुरस्काराला एक विशेष मान आहे. कारण, आयपीएलच्या संपूर्ण हंगामात गोलंदाजी किंवा फलंदाजीने सर्वोत्तम कामगिरी करणार्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो.
गेल्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०१९ मध्ये हा पुरस्कार केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसेल याला मिळाला होता. आयपीएल २०२० मध्ये कोणत्या ५ खेळाडूंना हा पुरस्कार मिळू शकेल याविषयी चर्चा करुया.
१) ग्लेन मॅक्सवेल
आयपीएल २०२० च्या लिलावात ग्लेन मॅक्सवेलला पंजाबने आपल्या संघात १० कोटी ७५ लाख इतकी रक्कम देऊन सामील केले आहे. मॅक्सवेल २०१४ ते २०१७ पर्यंत पंजाबच्या संघाचा भाग होता. पुन्हा त्याला संघात सामील करून घेण्याचे कारण म्हणजे त्याची अष्टपैलू कामगिरी करण्याची क्षमता.
मॅक्सवेलचा दिवस असल्यास तो कितीही अशक्यप्राय सामना आपल्या संघाला लीलया जिंकून देऊ शकतो. तडाखेबंद फलंदाजी सोबतच किफायतशीर गोलंदाजी तो करतो. मॅक्सवेलचे क्षेत्ररक्षण हे देखील बलस्थान आहे. मॅक्सवेलची गणना जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते.
मॅक्सवेलची आयपीएल कारकीर्दीची आत्तापर्यंत ठीकठाक राहिली आहे. त्याने ६९ सामन्यात २२ च्या सरासरी व १६१ च्या स्ट्राइक रेटने १३९७ धावा जमविल्या आहेत. याय १० अर्धशतकांचा समावेश आहे. मॅक्सवेलने आतापर्यंत गोलंदाजीत १६ बळीही घेतले आहेत. मॅक्सवेलने आयपीएल कारकिर्दीत ९१ षटकार ठोकले आहेत.
२) रिषभ पंत
रिषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक्स फॅक्टर आहे. त्याने मागील मोसमात १६ सामन्यात १६२.६६ च्या स्ट्राईक रेट आणि ३७.५३ च्या सरासरीने ४८८ धावा ठोकल्या होत्या. पंतने सलामीच्या सामन्यातच मुंबई विरुद्ध अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक ठोकलेले.
चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणाऱ्या पंतचा खेळ दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि माजी मार्गदर्शक सौरव गांगुली यांनाही आवडतो. या दोन दिग्गजांचे असे म्हणणे आहे की, “हा खेळाडू भारतीय क्रिकेटचे भविष्य असेल.”
पंत आयपीएल २०१८ मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता, ज्यात नाबाद १२८ धावांच्या खेळीचा समावेश होता. रिषभने दिल्ली कॅपिटल्सला अनेक सामने एकट्याच्या जीवावर जिंकून दिले आहेत. म्हणूनच पंत ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ चा पुरस्कार जिंकू शकतो.
३) राशिद खान
अत्यंत कमी वयात दिग्गज खेळाडू बनलेला, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान हा देखील स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बनू शकतो. राशिदने आत्तापर्यंत आयपीएलचे ४६ सामने खेळताना ६.५५ च्या सरासरीने ५५ बळी घेतले आहेत.
आयपीएल सोबतच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील धुमाकूळ घालत आहे. जगभरातील लीग क्रिकेटमध्ये सर्वाधिक मागणी असणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो.
यूएई मधील फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर राशिद अधिक धोकादायक ठरू शकतो. उत्कृष्ट गोलंदाजीसोबत खालच्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करण्यात तो माहीर आहे. त्याचा फलंदाजीतील स्ट्राईक रेट १६५.२० इतका अफलातून आहे.
४) हार्दिक पांड्या
नुकताच पिता झालेला, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा देखील ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ या पुरस्कारासाठी दावेदार आहे. आयपीएल मध्येच मुंबई इंडियन्ससाठी शानदार कामगिरी करून त्याने भारतीय संघात जागा मिळवली होती.
दुखापतीतून सावरल्यानंतर, फेब्रुवारी महिन्यात, डी.वाय पाटील टी२० स्पर्धेतून त्याने पुनरागमन केले आहे. यात त्याने दोन शतके झळकावली होती. ५५ चेंडूत १५८ धावांची खेळी करताना तब्बल २० षटकार मारण्याचा विक्रम त्याने नोंदवला आहे.
पांड्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ६६ सामने खेळताना १५४ च्या स्ट्राईक रेटने १,०६८ धावा काढल्या आहेत. यात ६८ षटकार सामील आहेत. मागील मोसमात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता.
५) आंद्रे रसेल
मागील वर्षीचा ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ पुरस्कार जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल यावर्षीदेखील या पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर तो कायम यशस्वी ठरला आहे.
मागील मोसमात रसेलने १४ सामने खेळताना २०४ च्या स्ट्राइक रेटने ५१० धावा जमवत सर्वाधिक ५२ षटकार मारले होते. याच बरोबर गोलंदाजीत ११ बळी देखील आपल्या नावे केले होते. त्यामुळे यावर्षीही तो हा पुरस्कार जिंकू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
४ असे वनडे सामने, जे टीम इंडियाने जिंकले केवळ १ धावेने
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
३ असे भारतीय खेळाडू जे आयपीएलमध्ये खेळले हे अनेकांना माहितीही नसेल…
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी: या दिवशी होणार आयपीएलचा अंतिम सामना; १० डबल हेडर्सचा असणार समावेश
१२ वर्षांनंतर अनिल कुंबळेने ‘मंकीगेट’ प्रकरणाबाबत केला मोठा खुलासा
५०० विकेट्स पूर्ण करणारा ब्रॉड घरच्या मैदानावर आहे दादा; कारणेही आहेत तशीच