भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने मैत्रीण अंजुम खानसोबत 16 जुलै रोजी विवाह केला. शिवम दुबेने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. हे फोटो पाहिल्यावर असे स्पष्ट दिसून येत आहे की, शिवमने मुस्लिम रीतीरिवाजसह लग्न केले आहे.
भारत देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. भारतातील क्रिकेट या खेळाला धर्म मानल्या जाणार्या या भारतात दुबसारखे असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी दुसऱ्या धर्मातील मुलीसोबत आपल्या प्रेमाची गाठ बांधली आहे. याच संदर्भात आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
1) मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर
भारतीय क्रिकेटच्या इतिहासामधील माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार मन्सूर अली खान पतौडी आणि बॉलीवूड अभिनेत्री शर्मिला टागोर हे जोडप खूप प्रसिद्ध आहे. मन्सूर अली खान पतौडी यांनी धर्माची सर्व बंधने बाजूला ठेऊन हिंदू बंगाली मुलगी शर्मिला टागोर यांना आपली अर्धांगिनी बनवले होते. ही त्या काळचे खूप प्रसिद्ध जोडी होती.
2) अजित आगरकर आणि फातिमा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू अजित आगरकर यांचे नाव क्रिकेटविश्वात प्रसिद्ध होते. क्रिकेटच्या तिनही स्वरूपात खेळत त्यांनी बरीच वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये आपले योगदान दिले होते. अजित आगरकर हे एका मराठी कुटुंबातील आहेत. परंतु एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी त्यांचा स्वीकार केला होता. त्यांनी 2007 मध्ये आपल्या मित्राची बहिण फातिमाशी लग्न केले होते.
3) जहीर खान आणि सागरिका
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानने धर्माच्या सीमारेषा ओलांडून एका हिंदू मुलीला स्वतःची जिवनसंगिनी बनवले होते. झहीर खानने वर्ष 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्याशी लग्न केले होते. सागरिका घाटगेने ‘चक दे इंडिया’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.
4) मोहम्मद कैफ आणि पूजा यादव
मोहम्मद कैफ यांनी इंग्लंडमध्ये भारताला 2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी मिळवून देण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारतीय क्रिकेटची उत्कृष्ट प्रतिमा निर्माण झाली. मोहम्मद यांनी क्रिकेटमध्ये जास्त काळ कामगिरी केली नाही. परंतु त्यांचे एका हिंदू मुलीवर प्रेम होते. मोहम्मद कैफ यांनी 2011 मध्ये पुजा यादव नावाच्या मुलीसोबत लग्न केले होते.
5) मोहम्मद अजहरुद्दीन आणि संगीता बिजलानी
भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे पहिले लग्न नौरीन नावाच्या मुलीसोबत झाले होते. तर 1996 साली नौरिनबरोबर त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर अझरुद्दीनने दुसऱ्यांदा बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. संगीता बिजलानी यांच्यासोबत लग्न करताना अझरुद्दीनने धर्माकडे न पाहता तिचा स्वीकार केला. परंतु संगीतासोबत अझहरचे संबंधही फार काळ टिकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलपुर्वी ४० वर्षीय धोनीने कमी केले वजन, पाहा ‘स्लिम अन् फिट’ थालाचे फोटो
क्या बात! सबस्टीट्यूट यष्टीरक्षकाने मागे वळून न पाहताही उडवली दांडी, झाली धोनीची आठवण
यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकचा धोनी-संगकाराच्या मांदियाळीत प्रवेश, केली ‘ही’ अद्वितीय कामगिरी