दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वरिष्ठ खेळाडंचा संघ इंग्लंडमध्ये असल्यामुळे निवडकर्त्यांनी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात निवडले आहे, ज्याचा कर्णधार हार्दिक पंड्या असेल. या संघात संजू सॅमसनने पुनरागमन केले आहे, तर राहुल त्रिपाठाला पहिल्यांदा राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. पण असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना आयर्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे अपेक्षित होते, परंतु निवडकर्त्यांनी त्यांच्या नावाचा विचार केला नाही. आपण या लेखात अशाच ५ खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
१. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
मुंबई रणजी संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आतापर्यंत भारतासाठी फक्त एक टी२० सामना खेळला आहे. या सामन्यात शॉने पहिल्या चेंडूवर विकेट गमावली होती. आयपीएलमध्ये मात्र तो सासत्याने खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी तो सलामीवीराची भूमिका पार पाडत असून त्याने या लीगमध्ये १४७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. असे असेले तरी, आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेसाठी शॉ भारतीय संघात सहभागी नाहीये
२. नितीश राणा (Nitish Rana)
मागच्या वर्षी देखील भारताच्या युवा खेळाडूंचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता आणि यामध्ये नितीश राणा या युवा फलंदाजाला पदार्पणाचा संधी मिळाली होती. या मालिकेत राणाच्या काही अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये त्याने चांगली फलंदाजी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेती त्याला संधी मिळण्याची अपेक्षा सर्वांनाच होती, पण तसे झाले नाही. अशातच आता आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून देखील निवडकर्त्यांनी त्याला वगळले आहे.
३. टी नटराजन (T Natarajan)
जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी ओळखला जाणाऱ्या टी-नटराजन याने २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत आणि यामध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२२ हंगामात त्याने खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आहेत. अशा चांगल्या प्रदर्शनानंतर देखील निवडकर्त्यांनी त्याला आयर्लंड दौऱ्यासाठीन संघात सहभागी केले नाही.
४. राहुल चाहर (Rahul Chahar)
मागच्या वर्षी टी२० विश्वचषकात युझवेंद्र चहलच्या जागी राहुल चाहरला भारतीय संघात निवडले गेले होते. आतापर्यंत त्याने ७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जसाठी त्याने १३ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० क्रिकेटमधील त्याचे प्रदर्शन समाधानकारक असले, तरी आयर्लंड दौऱ्यासाठी त्याला निवडले गेले नाहीये.
५. राहुल तेवतिया (Rahul Tewatia)
आधी आयपीएल २०२० मध्ये आणि आता आयपीएल २०२२ मध्ये राहुल तेवतिया याने स्वतःच्या प्रदर्शनामुळे सर्वांचे लक्ष वेधले. यावर्षी आयपीएलची नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्ससाठी त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हातातून निसटलेल्या सामन्यांमध्ये एकट्या तेवतियाच्या जोरावर गुजरात संघाने विजय मिळवला. आयपीएलमधील जबरदस्त प्रदर्शनानंर देखील निवडकर्त्यांनी त्याला भारतीय संघात संधी दिली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन
भारत की दक्षिण आफ्रिका, आज कोणाच नाणं खणकणार? पाहा काय सांगते सामन्याची खेळपट्टी
सत्ताविसाव्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघाला विजेतेपद