आयपीएल २०२२मध्ये अनेक खेळाडू मालामाल झाले. चालू हंगामापूर्वी आयोजित केल्या गेलेल्या मेगा लिलावात अनेक खेळाडू असे होते, ज्यांना खरेदी करण्यासाठी फ्रँचायझीने कोट्यावधी रुपये खरेदी केले. परंतु दुसरीकडे काही गुणवंत खेळाडूंना मात्र त्यांच्या मूळ किमतीत खरेदी केले गेले. या स्वस्तात खरेदी केल्या गेलेल्या खेळाडूंपैकी काहींनी दिग्गजांना लाजवेल असे प्रदर्शन करून दाखवले. आपण या लेखात त्या पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांना मेगा लिलावात फ्रँचायझींनी मूळ किमतीत खरेदी केले, पण त्यांचे प्रदर्शन दमदार राहिले.
मूळ किमतीत खरेदी केलेल्या ‘या’ पाच खेळाडूंनी संघासाठी केले उत्कृष्ट प्रदर्शन
भानुका राजपक्षा
मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक गाजवणारा श्रीलंकन फलंदाज भानुका राजपक्षा (Bhanuka Rajapaksa) याने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली होती. वरच्या फळीतील या डावखुऱ्या फलंदाजासाठी अनेकजण बोली लावतील अशी अपेक्षा होती, पण फक्त पंजाब किंग्जने त्याच्यावर बोली लावली. इतर संघांनी राजपक्षाला खरेदी करण्याची इच्छाही दाखवली नाही. पंजाबने त्याला मूळ किमतीमध्ये खरेदी केले. हंगामात खेळलेल्या ७ डावांमध्ये त्याने १६५ पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने २०१ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुकेश चौधरी
चेन्नई सुपर किंग्जने मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) याला अवघ्या २० लाखाच्या मूळ किमतीमध्ये खरेदी केले. सीएसकेव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच संघाने मुकेशबर बोली लावली नाही आणि त्यामुळे सीएसकेला तो स्वस्तात मिळाला. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती, पण काही सामने झाल्यानंतर सीएसकेने त्याला संधी दिली. त्याने देखील या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. सीएसकेसाठी त्याने १० सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत.
मोहसिन खान
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सने जबरदस्त प्रदर्शन केले आहे आणि संघ प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्याच्या वाटेवर आहे. मेगा लिलावात लखनऊने अनेक गुणवंत अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केले होते. त्यांच्यातील एक म्हणजेच मोहसिन खान (Mohsin Khan), ज्याला संघाने २० लाखाच्या मूळ किमतीमध्ये खरेदी केले. मोहसिनला हंगामात पाच सामन्यांमध्ये संधी मिळाली आणि यामध्ये त्याने ९ विकेट्स नावावर केल्या. यादरम्यान त्याने ६च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या.
उमेश यादव
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आणि टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा उमेश यादव (Umesh Yadav) मेगा लिलावात २ कोटीच्या मूळ किमतीसह उतरला होता. केकेआरने त्याला मूळ किमतीमध्ये खरेदी केल्यानंतर अनेकांनी, हा संघाचा चुकीचा निर्णय असल्याचे सांगितले. परंतु उमेशने मात्र चालू हंगामात त्याचा अनुभव पणाला लावला आणि स्वतःला सिद्ध केले. त्याने खेळलेल्या १० सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या. नवीन चेंडूसह तो हंगामात अधिक घातक दिसला आहे.
टीम साऊदी
कोलकातासाठी टीम साऊदी (Tim Southee) किफायशीर गोलंदाज ठरला आहे. हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. मात्र, पॅट कमिन्स कॅम्पमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले गेले. केकेआरला १.५ कोटी मूळ किमतीमध्ये मिळालेल्या या खेळाडूने खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. या प्रदर्शानंतर त्याला टी-२० मध्येही चांगली गोलंदाजी करू शकत असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. पावरप्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी त्याला ओळखले जाते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीब असावे तर असे! चहलच्या एकाच षटकात वॉर्नरला एक-दोन नव्हे, तर चक्क तीनदा जीवदान
वॉर्नरची आयपीएलमधील ‘या’ विक्रमात विराट, शिखरशी बरोबरी, आता केवळ रैना आहे पुढे
‘खूपच निराशाजनक, धावा कमी केल्या आणि…’ कर्णधार सॅमसनने स्पष्ट केले राजस्थानच्या पराभवाचे कारण