---Advertisement---

५०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

On: मंगळवार, जुलै 28, 2020 10:19 PM
---Advertisement---

मँचेस्टर| इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात आज(२८ जुलै) पाचव्या दिवशी इंग्लंडने २६९ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ३ सामन्यांची कसोटी मालिका यजमान इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली. इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटीतील विजयात स्टुअर्ट ब्रॉडने १० विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.

ह्या सामन्यात ब्रॉडने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. याबरोबरच ह्या सामन्यादरम्यान त्याने कसोटी कारकिर्दीत ५०० विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला. तो ५०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार करणारा जगातील ७वा गोलंदाज ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. तसेच इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचाही दुसराच गोलंदाज ठरला.

विशेष म्हणजे ब्रॉडने या सामन्यात फलंदाजी करताना पहिल्या डावात ६२ धावांची अर्धशतकी खेळीही केली होती. त्याचबरोबर ब्रॉडने हा ५०० विकेट्सचा टप्पा पार करताना अनेर विक्रम रचले. या विक्रमांचा घेतलेला आढावा –

ब्रॉडने केले हे खास विक्रम – 

१. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

८००- मुथय्या मुरलीधरन, सामने- १३३

७०८- शेन वॉर्न, सामने- १४५

६१९- अनिल कुंबळे, सामने- १३२

५८९- जेम्स अँडरसन, सामने- १५३

५६३- ग्लेन मॅकग्रा, सामने- १२४

५१९- कर्टनी वॉल्श, सामने- १३२

५०१- स्टुअर्ट ब्रॉड, सामने- १४०

२. कसोटीत ३००० धावा आणि ५०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारे क्रिकेटपटू – 

शेन वॉर्न – ३१५४ धावा आणि ७०८ विकेट्स

स्टुअर्ट ब्रॉड – ३२८४ धावा आणि ५०१ विकेट्स 

३. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

७९ – स्टुअर्ट ब्रॉड

७८ – जेम्स अँडरसन

५९ – मोईन अली

५७ – बॉब विलिस

४५ – डेरेक अंडरवूड

४. कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज –

५८९- जेम्स अँडरसन, सामने- १५३

५६३- ग्लेन मॅकग्रा, सामने- १२४

५१९- कर्टनी वॉल्श, सामने- १३२

५०१- स्टुअर्ट ब्रॉड, सामने- १४०

५. एकाच कसोटी सामन्यात फलंदाजी करताना अर्धशतक आणि गोलंदाजी करताना १० विकेट्स घेणारा स्टुअर्ट ब्रॉड सर इयान बॉथम नंतरचा पहिलाच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आहे. बॉथम यांनी शेवटचे १९८० मध्ये भारताविरुद्ध मुंबई कसोटीत असा पराक्रम केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ब्रॉडने हा कारनामा केला.

६. कमी वयात कसोटीत ५०० विकेट्स घेणारे गोलंदाज

३१ वर्ष ११ महिने- मुथय्या मुरलीधरन

३४ वर्ष १ महिना- स्टुअर्ट ब्रॉड

३४ वर्ष ६ महिने- शेन वॉर्न

३५ वर्ष १ महिना- जेम्स अँडरसन

३५ वर्ष ४ महिने- अनिल कुंबळे

३५ वर्ष ५ महिने- ग्लेन मॅकग्रा

३८ वर्ष ५ महिने- कर्टनी वॉल्श

७. ब्रॉडने कसोटीत या फलंदाजांना केले सर्वाधिक वेळा बाद –

१२- डेविड वॉर्नर

११- मायकेल क्लार्क

१०- एबी डिविलियर्स, रॉस टेलर

८- हशिम अमला, ख्रिस रॉदर्स, स्टिवन स्मिथ, शेन वॉटसन

७- मिचेल जॉन्सन

६- अझर अली, एमएस धोनी, ब्रॅड हॅडिन, टीम लेथम, ब्रेंडन मॅक्क्युलम, अजिंक्य रहाणे, युनिस खान, किमार रोच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---