रनमशीन विराट कोहलीसाठी हे ५ विक्रम मोडणं जरा कठीणच

भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. एखादा क्रिकेटर किती परिपुर्ण असावा याचे उदाहरण म्हणून विराटकडे पाहिले जाते. क्रिकेटमधील कामगिरी, फिटनेस किंवा जाहीरात विश्व सगळीकडे विराट एक मोठा ब्रॅंड प्रस्थापित झालाय. विराट हा सोशल मिडीयावरही तेवढाच लोकप्रिय आहे. विराट या सर्वांना सतत चांगल्या कामगिरीची जोड देत आला आहे. सतत तो आपल्या कामगिरीतून बोलत असतो. सतत क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम करत असतो. विराट जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा तो काही ना काही विक्रम करतोच.

अशा या भारतीय कर्णधाराला तरीही काही विक्रम मोडणे थोडं अवघड आहे. (5 records Virat Kohli can never break.) अवघड जरी असले तरी अशक्य म्हणू शकत नाही. कारण हे क्रिकेट आहे.

अशाच विक्रमातील काही विक्रम- 

५. वनडे कारकिर्दीत सर्वाधिक धावा

विराटने वनडे क्रिकेटमध्ये २४८ सामन्यांत ५९.३३च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत. यात त्याने ४३ शतके व ५८ अर्धशतके केली आहेत. दुसऱ्या बाजूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये ४६३ सामन्यांत ४४.८३च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. यात सचिनच्या ४९ शतके व ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट सचिनपेक्षा २१५ वनडे सामने कमी खेळला असून सध्या त्याचे वय ३१ वर्ष आहे. सचिनपुढे जाण्यासाठी त्याला अजूनही वनडेत ६५५९ धावांची गरज आहे.

४. कसोटी डावात ४०० धावा

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ४०० धावा करण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने २००४मध्ये इंग्लंडविरुद्ध ७७८ मिनीटं फलंदाजी करताना ५८२ चेंडूत नाबाद ४०० धावा केल्या आहेत. कसोटीत विराटची धावसंख्या ही २५४ राहिली आहे. त्याने ७ वेळा २०० धावांचा टप्पा पार केला आहे. परंतु सध्याचे क्रिकेट पाहिले, विराटचा फलंदाजीचा क्रम व आक्रमक स्वभाव पाहिला तर हा विक्रम थोडा अवघड वाटतो.

३. वनडे डावात २६४ धावा

भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने वनडेत ३ वेळा २०० धावांचा टप्पा पार केला आहे. सचिन व सेहवाग हे अन्य खेळाडू आहे ज्यांनीही हा टप्पा पार केला आहे. विराटची सर्वोत्तम धावसंख्या १८३ आहे. जागतिक क्रिकेटमध्ये वनडेत सर्वोत्तम धावा या २६४ असून त्या भारताच्या रोहित शर्मानेच केलेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या विराटसाठी हा पराक्रमही थोडा अवघडच आहे.

२. कसोटी कारकिर्दीत १६ हजार धावा

वरील सर्व विक्रमांतील सर्वात अवघड विक्रम हा कसोटी कारकिर्दीतील १६ हजार धावांचा टप्पाच विराटसाठी राहणार आहे. विराटने ८६ कसोटीत ५३.६३च्या सरासरीने ७२४० धावा केल्या आहेत. यात त्याच्या २७ शतके व २२ अर्धशतकांचा समावेश आहे.

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा भारताच्याच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने वनडेत २०० कसोटी सामन्यात ५३.७८च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. त्यात ५१ शतके व ६८ अर्धशतकांचा समावेश आहे.

विराटला हा विक्रम मागे टाकण्यासाठी ८६८१ धावांची गरज आहे. सध्या कसोटी क्रिकेटपेक्षाही मर्यादीत षटकांचे क्रिकेट जास्त खेळले जाते. विराट वर्षाला सरासरी ९ कसोटी सामने खेळत आला आहे. यामुळे विराटने त्याचा हा फाॅर्म असाच ठेवला तर पुढे हा विक्रम मोडण्यासाठी विराटला ८०-९० कसोटी सामने खेळावे लागणार आहेत. शिवाय फिटनेस हा एक मोठा फॅक्टरही असणार आहे.

१. २०० कसोटी सामने- 

असं गमतीने म्हणतात की विराट ५०० वनडे सामने खेळेल पण २०० कसोटी सामने थोडे अवघड वाटतात. विराट पुढे १० वर्ष अजून क्रिकेट खेळला व भारत वर्षाला सरासरी १० कसोटी सामने खेळला तरीही विराटसाठी २०० कसोटी सामने खेळणे मोठे अवघड समीकरण आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर २४ वर्ष क्रिकेट खेळला व वयाच्या ४०व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झाला. मर्यादीत षटकांचे वाढलेले प्रमाण, फिटनेस व इतर अनेक गोष्टींमुळे विराटसाठी हा विक्रम अवघड ठरणार आहे.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील अन्य लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like