डावखुरा स्फोटक फलंदाज सुरेश रैना आता आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळताना दिसणार नाही. सुरेश रैनाने मंगळवारी भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा निरोप घेतला. रैना बीसीसीआयच्या कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसणार नाही आणि आता तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. वृत्तानुसार, सुरेश रैना आता परदेशी लीगमध्ये खेळणार असून त्यासाठी तो गाझियाबादमध्ये जबरदस्त सरावही करत आहे. रैनाने एक दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये विशेषत: आयपीएलमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पाच महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
It has been an absolute honour to represent my country & state UP. I would like to announce my retirement from all formats of Cricket. I would like to thank @BCCI, @UPCACricket, @ChennaiIPL, @ShuklaRajiv sir & all my fans for their support and unwavering faith in my abilities 🇮🇳
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 6, 2022
1. सुरेश रैनाला आयपीएल 2010 मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला होता. बीसीसीआयने त्याला हा सन्मान दिला. याच हंगामाच्या अंतिम सामन्यात सुरेश रैनाने अर्धशतक झळकावले आणि या जोरावर चेन्नईने मुंबईला अंतिम फेरीत पराभूत करून आयपीएल जिंकली.
2. सुरेश रैनाने आयपीएल 2014 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या क्वालिफायर 2 सामन्यात फक्त 25 चेंडूत 87 धावा केल्या होत्या. सुरेश रैनाने सर्वात जलद शतक झळकावले पण धावबाद झाल्यामुळे त्याचे शतक 13 धावांनी हुकले.
3. आयपीएल 2019 मध्ये, सुरेश रैनाने या स्पर्धेत 5000 धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आणि 32.52च्या सरासरीने 5528 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि 39 अर्धशतके झळकावले आहेत.
4. सुरेश रैनाने सलग 7 आयपीएल हंगामात 400 हून अधिक धावा केल्या. सुरेश रैनाने 2013 साली आपली सर्वोत्तम कामगिरी केली. या हंगामात त्याने 42च्या सरासरीने 548 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि 4 अर्धशतकं झळकली.
5. सुरेश रैनाचा आयपीएल प्रवास निराशाजनक होता. हा खेळाडू 2021 मध्ये शेवटची आयपीएल खेळला होता आणि त्यात रैनाच्या बॅटने 17.77च्या सरासरीने फक्त 160 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2022 मध्ये त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे त्याला आयपीएलचा शेवटचा हंगाम खेळता आला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ASIA CUP: सावधान! श्रीलंकन कर्णधाराने टीम इंडियाला दिलाय सतर्कतेचा इशारा
INDvsSL: भारतापुढे स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान, कार्तिकची होणार एन्ट्री; पाहा संभाव्य इलेव्हन
Breaking: सुरेश रैनाची आयपीएलमधून निवृत्ती, संपवले बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध!