काही दिवसांपूर्वी आयपीएलचे संस्थापक ललित मोदी आणि बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. मागच्या महितन्यात ललित मोदींनी स्वतः त्यांच्या नात्याची माहिती दिली होती. परंतु आता एक महिन्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांमध्ये याविषयी वगेवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
मागच्या महिन्यात ललित मोदी (Lalit Modi) यांना त्यांच्या सोशल मीडिया खात्याचा प्रोफाईल फोटो बदलला होता. त्यांनी सुष्मिता सेन (Sushmita Sen) सोबतचा फोटो प्रोफाईलला ठेवला होता आणि सोबत बायोही बदलला होता. मात्र, आता त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये मोठा बदल दिसत आहे. त्यांना सुश्मितासोबतचा प्रोफाईल फोटो काढून स्वतःचा नवीन फोटो ठेवला आहे. तसेच इंस्टा बायोमधील सुश्मिताचे नाव देखील काठून टाकले आहे. आयपीएल संस्थापकांच्या सोशल मीडिया खात्यात झालेला हा बदल पाहून असा अंदाज बांधला जात आहे की, सुष्मिता आणि ललित मोदी आता वेगळे झाले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ASIA CUP: सावधान! श्रीलंकन कर्णधाराने टीम इंडियाला दिलाय सतर्कतेचा इशारा
‘तुला कळत नाही का**!’ फोटोखाली चुकीची कमेंट करणाऱ्याला संजना गणेशनने झापलं
Breaking: सुरेश रैनाची आयपीएलमधून निवृत्ती, संपवले बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध






