---Advertisement---

‘तुला कळत नाही का**!’ फोटोखाली चुकीची कमेंट करणाऱ्याला संजना गणेशनने झापलं

On: मंगळवार, सप्टेंबर 6, 2022 12:04 PM
Sanjana-And-Bumrah
---Advertisement---

सध्या आशिया चषक 2022 सुरू आहे. यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीच्या कारणांमुळे स्पर्धेबाहेर आहे. अशातच त्याची पत्नी संजना गणेशन हिने एक जुना फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याखाली तिने थ्रोबॅक मेमरिज असं कॅप्शन दिले आहे. यावरून हा फोटो जूना असल्याचे सिद्ध होते. मात्र, तरीही एका चाहत्याने त्याखाली चुकीच्या शब्दांत एक कमेंट करून बुमराहला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण संजनाने त्या नेटकऱ्याला रोखठोक उत्तर दिले आहे.

https://www.instagram.com/p/CiH57lJJRc5/?utm_source=ig_web_copy_link

Sanjana Ganeshan comment
Screengarb/Sanjana Ganesan

संजान गणेशन (Sanjana Ganesan) हिने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे,  “जसप्रीत आणि माझा #थ्रोबॅक फोटो.” या फोटवर एका नेटकऱ्याने एक चुकीची कमेंट केली. नेटकऱ्याची ही अशी प्रतिक्रिया पाहून संजनाचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. या नेटकऱ्याला तिने स्वतः रिप्लाय देत लिहिले की, “थ्रोबॉक फोटो आहे, दिसत नाही का चोमू.” दरम्यान, चाहत्यांना संजनाचा हा अनेखा अंदाच पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

कुटुंब अन् माजी क्रिकेटपटूंनी केली अर्शदीपची पाठराखण! म्हणाले, ‘हे सगळं…’
भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी करणारा फलंदाज, मुलीच्या मृत्यूनंतर लागला होता धार्मिक प्रवचन द्यायला
Video: मोहम्मद रिजवानने भारतीय मुलीला घातला दंडवत, वाचा काय आहे प्रकरण  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---