भारतीय क्रिकेट संघाने त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९३२ साली खेळला होता. तेव्हापासून भारतीय संघासाठी आतापर्यंत १००० पेक्षा अधिक खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. यादरम्यान अनेकांनी विश्वविक्रमही बनवले. पण असे खूप कमी आहेत, ज्यांनी देशासाठी केलेला विक्रम आजही अबाधित आहे. चला तर जाणून घेऊया अशाच काही भारतीय खेळाडूंविषयी, ज्यांनी केलेले विक्रम आजही जसेच्या तसे आहेत.
एमएस धोनी –
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीपाठी अनेक खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या आहेत. धोनीने यष्टीरक्षकाच्या भूमिकेत एकूण १९५ स्टंपिंग केल्या आहेत, जो आजही एक अबाधित विश्वविक्रम आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२३, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३४ आणि कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने ३८ खेळाडूंना स्टंपिंग करून तंबूचा रस्ता दाखवला आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज कर्णधार कुमार संगकाराने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत १३९ स्टंपिंग केल्या आणि या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सचिन तेंडुलकर –
सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) याला चाहते प्रमाणे क्रिकेटचा देव असे म्हणातात. चाहत्यांचे हे प्रम सचिनने क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळेच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक १०० शतकांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने ५१ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके केली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ७१ आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. विराटला सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी दावेदार मानले जात होते, पण मागच्या अडीच वर्षांपासून विराट एकही शतक करू शकला नाहीये. अशात सध्या तरी इतर कोणता फलंदाज दिसत नाही, जो भविष्यात सचिनचा हा विक्रम मोडेल.
रोहित शर्मा –
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर देखील असा एक विक्रम आहे, जो मोडणे कोणत्याही फलंदासाठी सोपे नसेल. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या एका वनडे सामन्यात २६४ धावांची खेळी केली होती. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खेळी आहे. या धावा करण्यासाठी रोहितने एकूण १७३ धावा खेळल्या, ज्यामध्ये ३३ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये एकदा नाही, तर तब्बल तीन वेळा द्विशतक ठोकले आहे. दुसरा कोणताही फलंदाज वनडेमध्ये तीन द्विशतके करू शकला नाहीये.
राहुल द्रविड –
‘द वॉल’ नावाने ओखलला जाणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) संध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविडने त्याच्या १६ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक चेंडूंचा सामना केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये द्रविडने एकूण ३१,२५८ चेंडूं खेळले आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. द्रविडने ही कामगिरी अवघ्या १६४ कसोटी सामन्यांमध्ये पूर्ण केली आहे. तसेच एकूण ४४,४३७ मिनिटे म्हणजेच ७३६ तास तो खेळपट्टीवर उपस्थित होता. या यादीत दिग्गज सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २९,४३७ चेंडूंचा सामना केला आहे.
बापू नाडकर्णी –
सध्याच्या क्रिकेट चाहत्यांपैकी खूप कमी जणांना बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni) यांच्याविषयी माहिती आहे. १९६० च्या दशकात या दिग्गज अष्टपैलूचा सामना करणे कोणत्याही फलंदाजासाठी डोकेदुखीचे काम होते. नाडकर्णींनी त्यांच्या फिरकी चेंडूची जादु दाखवूत कसोटी क्रिकेटमध्ये लागोपाठ २१ षटके निर्धाव टाकले होते.
बापू नाडकर्णींनी १२ जानेवारी १९६४ साली मद्रासमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध लागोपाठ २१ षटके निर्धाव टाकली होती. पण या डावात त्यांना एकही विकेट मिळाली नाही, पण त्यांनी फक्त ५ धावा खर्च केल्या होत्या. या डावात त्यांना एकूण ३२ षटके टाकली होती आणि त्यापैकी २७ षटके ही निर्धाव होती. त्यांचा इकोनॉमी रेट फक्त ०.१५ होता. हा विक्रम भविष्यात कोणता गोलंदाज मोडले, याची खूपच कमी शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शेवटच्या वनडेत कशी असणार मॅंचेस्टरची खेळपट्टी? कोणत्या संघाला होणार फायदा? वाचा सर्वकाही
निर्णायक सामन्याची वेळ बदलली, वाचा कधी सुरू होणार इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे
मॅंचेस्टरमध्ये टीम इंडियाची वाट अवघड? शेवटच्या सामन्यासाठी संघात होणार बदल?