महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने “५व्या कुमार/कुमारी फेडशन कप कबड्डी स्पर्धेसाठी ” आपले दोन्ही संघ जाहीर केले. साताऱ्याच्या सोनाली हेळवी हिच्याकडे कुमारी तर, कोल्हापूरच्या मनोज चव्हाण याच्याकडे कुमार संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले.
उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असो.च्यावतीने आणि नॉर्दन कोल्ड फिल्ड ली.काकरी यांच्या सहकार्याने २२ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत काकरी, जिल्हा- सोनभद्र, उत्तर प्रदेश येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेला संघचं या स्पर्धेत कायम ठेवण्यात आला आहे. हा निवडण्यात आलेला संघ दि.२०मार्च २०१८रोजी रात्रौ १०-००वा. जबलपूर एक्सप्रेसने लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथून स्पर्धेकरिता रवाना होईल असे या पत्रकाद्वारे सचिव आस्वाद पाटील यांनी प्रसार माध्यमांना कळविले .
महाराष्ट्राचे संघ खालील प्रमाणे.
कुमारी गट संघ :- १) सोनाली हेळवी – संघनायिका (सातारा), २)मानसी रोडे, (पुणे), ३) ऐश्वर्या शिंदे (पुणे), ४) अंजली मुळे (पुणे), ५) आसावरी खोचरे (कोल्हापूर), ६) काजल सावंत (सातारा), ७) करिष्मा म्हात्रे (मुं. उपनगर), ८)उत्कर्षा इनामदार (सांगली), ९) तस्मीन बुरोंडकर, (रत्नागिरी), १०) प्राजक्ता पुजारी (ठाणे), ११) निमिशा म्हात्रे (रायगड), १२)अंकिता चव्हाण (पुणे).
प्रशिक्षक :- समीर थोरात (सातारा), व्यवस्थापिका :- सौ. स्वाती पुंजाळ (सोलापूर).
कुमार गट संघ :- १) मनोज चव्हाण – संघनायक (कोल्हापूर), २) ऋषिकेश देसाई (कोल्हापूर), ३) सौरभ पाटील (कोल्हापूर), ४) शुभम शिंदे (रत्नागिरी), ५) वीरधवल नायकवडी (सांगली), ६) सतपाल कुमावत (सांगली), ७) अभिषेक पडेलकर (मुं. उपनगर), ८) गणेश शाहू (जळगाव), ९) अनिकेत पेवेकर (मुं. शहर ), १०) तेजस कदम (ठाणे), ११)नितीन महाजन (जळगाव), १२) साईराज भोसले (सातारा).
प्रशिक्षक :- ज्ञानेश्वर गिरी ( परभणी), व्यवस्थापक :- संतोष शिंदे (रत्नागिरी).