पुणे, दि. 12 जानेवारी 2024 – महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी यांच्या वतीने आयोजित व इंडियन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या 67 व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत सांघिक गटात महाराष्ट्र संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत 14 वर्षाखालील मुले व मुली, 17 वर्षाखालील मुले, 19 वर्षाखालील मुली या चार गटात अंतिम फेरीत प्रवेश केला.
उंड्री येथील संपूर्णपणे काचेच्या महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत गुजरातच्या वेद पटेलने मध्यप्रदेशच्या तनय जसवाल(मध्यप्रदेश) 15-01 असा तर, दिल्लीच्या जियाद अहमदने आसामच्या मोनिश आथोकोपामचा 15-02 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
सांघिक गटात उपांत्य फेरीत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अयान दलाल, इंद्रांश बाडगुजर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने चंदीगड संघाचा 2-0 असा तर, दुसऱ्या सामन्यात तामिळनाडू संघाने मध्य प्रदेश संघाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
14 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने आयपीएससी संघाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र संघाकडून दीपशिका थोरातने आदित्री भट्टाचार्जीचा 11-05, 11-04 असा तर, वसुंधरा नागरेने वान्या गुप्ताचा 11-07, 11-05 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात तमिळनाडू संघाने आयबीएसएसओ संघावर 2-1 असा विजय मिळवला. (67th School National Squash Tournament Maharashtra team enters the finals in the team group)
निकाल: वैयक्तिक गट: 19 वर्षाखालील मुले: पहिली फेरी:
शिवेश कोनोई (झारखंड)वि.वि.आरित हुसेन(दिल्ली)15-05;
विराज साहनी (चंदीगड) वि.वि.जिवा आवटे(गोवा) 15-09;
वेद पटेल (गुजरात) वि.वि.तनय जसवाल(मध्यप्रदेश) 15-01;
आदित्य अग्रवाल (आसाम)वि.वि.जीवन मुरकुट (सीबीएससी)15-01;
संदेश पीआर(तामिळनाडू)वि.वि.गोर्लो जेम्स(आंध्रप्रदेश) 15-2;
रुहान अरोरा(आयबीएसएसओ)वि.वि.पियुश ठाकूर(गोवा) 15-03;
वंश चंद्राकर (चंदीगड) वि.वि.देवानंद सहानी(आसाम) 15-00;
जियाद अहमद (दिल्ली) वि.वि.मोनिश आथोकोपाम (आसाम) 15-02;
दक्ष ठाकूर (मध्यप्रदेश) वि.वि.भोज राज (छत्तीसगड) 15-13.
सांघिक गट: 14 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
तामिळनाडू वि.वि.मध्य प्रदेश 2-0 (दिनेश वि.वि.आरव लोहिया 11-07, 11-04; लोकेश वि.वि. दक्ष फिरोदिया 11-01, 11-03);
महाराष्ट्र वि.वि.चंदीगड 2-0 (अयान दलाल वि.वि.अंकुश 11-00, 11-03; इंद्रांश बाडगुजर वि.वि.अनहद सिंग 11-04, 11-02)
14 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
तमिळनाडू वि.वि.आयबीएसएसओ 2-1(एलिझा पराभुत वि.छवी पांचाल 01-11, 00-11; नितिया श्री वि.वि.अमायरा मेहता 11-05, 11-03; वैशालिनी पुढे चाल वि.कियारा गादा;
महाराष्ट्र वि.वि.आयपीएससी 2-0 (दीपशिका थोरात वि.वि.आदित्री भट्टाचार्जी 11-05, 11-04; वसुंधरा नागरे वि.वि.वान्या गुप्ता 11-07, 11-05);
17 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
तामिळनाडू वि.वि.मध्यप्रदेश 2-0 (अनन्या नारायण वि.वि.कात्यायनी सक्तवत 11-02, 11-03; प्रियदर्शिनी वि.वि.इशिका खंडेलवाल 11-05, 11-07);
आयपीएससी वि.वि.दिल्ली 2-0 (इशिका आनंद वि.वि.निक्षा मंकतला 11-01, 11-07; छवी सरन वि.वि.दिया ढीलोन 11-05, 07-11, 11-06);
17 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
आयबीएसएसओ वि.वि.दिल्ली 2-0 (उदित मिश्रा वि.वि.अर्णव खंडेलवाल 11-02, 11-06; दर्श चौधरी वि.वि.इशकरन सिंग 11-08, 11-09);
महाराष्ट्र वि.वि.तामिळनाडू 2-0 (रिधान शहा वि.वि.लक्ष्मण हरी 11-06, 11-08; आयुष मिश्रा वि.वि.इजाज मोहम्मद 11-08, 11-05);
19 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
महाराष्ट्र वि.वि.मध्य प्रदेश 2-0 (हावरा भानापूरवाला वि.वि.प्रियांशी पटेल 11-07, 11-01; रीवा निंबाळकर वि.वि.यशवी लखवानी 11-03, 11-06);
आयपीएससी वि.वि.चंदीगड 2-0(दीत्या वांगाणी वि.वि.कासिफा 11-01, 11-01; यशी जैन वि.वि.काजल 11-03, 11-01);
19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
तामिळनाडू वि.वि.मध्यप्रदेश 2-1 (मेगप्पन वि.वि.दक्ष सिंग 11-04, 11-01; संदेश पीआर पराभुत वि.तनवीत सिंग मुंद्रा 11-07, 10-12, 07-11; लोकेश वि.वि.आर्यन बहेती 11-02, 11-07) ;
चंदीगड वि.वि. महाराष्ट्र 2-0 (आशू वि.वि.प्रिन्स यादव 10-12, 11-08, 14-12; कुशल सिंग वि.वि.प्रकाश आहुजी 07-11, 12-10, 11-06)
महत्वाच्या बातम्या –
PAK vs NZ: पाकिस्तानी सलामीवीराचा ‘नो लुक शॉट’ भलताच गाजला, दिग्गज म्हणाले हा तर पुढचा ‘सुपरस्टार’
इंग्लंडमधील लीड्स बेकेट विद्यापीठाचे विद्यार्थी आयएसएमएस इन्स्टिट्यूटला भेट देणार