Saim Ayub In PAK vs NZ T20I: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या पाच टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी(12 जानेवारी) ऑकलंड येथे खेळण्यात आला. सामन्याच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानचा युवा फलंदाज सईम अयुब याने एक जबरदस्त शॉट खेळला. या चेंडूवर फक्त त्याने चेंडूवर लक्ष ठेवून शॉट मारला. मॅट हेनरीच्या षटकात त्याने मारलेला शॉट सध्या सोशल मिडीयावर ट्रेंड होतोय. त्याने शॉट खेळल्यानंतर आपली नजर ही खेळपट्टीवरच रोखून ठेवली. अर्थात चेंडू कुठे जातोय हे त्याने बघितले नाही. म्हणूनच हा शॉट आता ‘नो लुक शॉट’ म्हणून ट्रेंड करतोय.
NO LOOK SHOT SAIM AYUB 🔥 pic.twitter.com/teXUtTE3J3
— RAZZAQ-🇵🇰🇸🇦🇵🇸 (@RAZZAQBOBBYSTAN) January 12, 2024
सईम अयुबने(Saim Ayub) खेळलेला हा शॉट थेट सीमारेषेबाहेर गेला. यासोबतच पाकिस्तान क्रिकेट चाहते पूर्व क्रिकेटर मियकल वॉन (Michael Vaughan) आणि ॲडम गिलख्रिस्ट(Adam Gilchrist) यांचा एक व्हिडीओ शेअर करत आहेत. ज्यामध्ये सईम अयुबकडे हे दोन्ही दिग्गज पाकिस्तान क्रिकेटचा भविष्यातील फलंदाज म्हणून पाहत आहेत. (saim-ayub-no-look-shot-pak-vs-nz-auckland-t20-trending-on-social-media)
Saim Ayub is going to be a superstar 👍 https://t.co/CGrUFoFmwg
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 12, 2024
अयुबने मागच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये त्याने एकही अर्धशतक केलेल नाही. परंतु सर्वजण त्याच्या या शैलीच कौतुक करत आहेत. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या ही मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेत पहिल्या सामन्यात अयुबने फक्त 8 चेंडूत 27 धावा केल्या आणि पाकिस्तानला जबरदस्त सुरवात करुन दिली. या सामन्यात त्याच्याकडून जास्त धावांची अपेक्षा होती. पण 27 धावा करून तो धावबाद झाला.
सईम अयुबने सांगितले नो लूक शॉटचे वैशिष्ट्य –
सामना संपल्यानंतर समालोचक आणि माजी खेळाडू उरुज मुमताज हिच्याशी चर्चा केली. यावेळी अयुबने आपल्या ‘नो लुक सिक्स’ची वैशिष्ट्य सांगितले. तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायआधी मी या शॉटचा सराव केला होता. मी असा एक खेळाडू आहे, ज्याला गॅपमध्ये शॉट मारायला आवडते. पण हे करत असताना मला क्रिकेटचे बेसिक सोडायचे नव्हते. त्यामुळे हा शॉट खेळताना शरीर एकदम स्थिर ठेवणं गरजेच होत आणि त्यामुळेच मी या पद्धतीचा सराव केला.”
अयुबच्या या सुंदर सुरवातीनंतरही पाकिस्तान संघाला सामन्यात 227 धावांच विशाल लक्ष गाठण्यात यश आल नाही. पाकिस्तान संघ 18 षटकात 180 धावा करून सर्वबाद झाला आणि न्यूझीलंडला 46 धावांनी विजय मिळाला. पराभवानंतर पाकिस्तान संघ 1-0 अशा अंतराने मागे पडला आहे. मालिकेतील दुसरा टी-20 सामना सेडन पार्क, हॅमिल्टन याठिकाणी रविवारी (14 जानेवारी) आयोजित केला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Shivam Dube । ‘आम्हाला माहीत आहे…’, सामनावीर ठरलेल्या दुबेला रोहित काय म्हणाला?
NZ vs PAK: न्यूझीलंडच्या फलंदाजाने आफ्रिदीला धु धु धुतला, एका ओवरमध्ये चोपल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा