---Advertisement---

टीम इंडिया सावधान! यूएईत पाकिस्तानी खेळाडूंचा राहिलाय बोलबाला, ८ खेळाडूंनी जिंकलेत ५८ सामने

On: रविवार, ऑक्टोबर 17, 2021 7:33 PM
Babar Azam, Rohit-Virat
---Advertisement---

रविवारी (१७ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत १६ संघांमध्ये ४५ सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. भारतीय संघाला २००७ नंतर टी२० विश्वचषकात एकही जेतेपद मिळवता आले नाहीये. तर ही स्पर्धा टी२० कर्णधार म्हणून विराट कोहलीची शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ जेतेपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार यात काही शंका नाही. परंतु यूएईमध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम आणि संघातील इतर ८ खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने यूएईमध्ये पाकिस्तान संघासाठी एकूण ११ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ईमाद वसीमने ११, हसन अलीने ९, शादाब खानने ८, आसिफ अली आणि फखर जमानने प्रत्येकी ६, शाहीन शाह आफ्रिदीने ४ आणि मोहम्मद नवाबने ३ सामने खेळले आहेत.

या सर्व सामन्यात या खेळाडूंना विजय मिळवण्यात यश आले आहे. या सर्व खेळाडूंनी एकूण ५८ टी -२० सामने खेळले आहेत. पाकिस्तान संघातील खेळाडूंची ही कामगिरी पाहिली तर, भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी अधिक जोर लावावा लागणार आहे.

विराट कोहलीला २७ तर बाबर आजमला १५ सामन्यात विजय मिळवण्यात यश 
भारत आणि पाकिस्तान संघाची आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी पहिली तर, पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध एकही सामन्यात विजय मिळवण्यात यश आले नाहीये. त्यामुळे या बाबतीत भारतीय संघ पुढे आहे.

तसेच विराट कोहली आणि बाबर आजम यांच्या नेतृत्वाबाबत बोलायचं झालं तर, विराट कोहली बाबर आजम पेक्षा पुढे आहे. विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ४५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये २७ सामन्यात त्याला विजय मिळवण्यात यश आले आहे, तर १४ सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बाबर आजमबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये १५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे, तर ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्‍मद शमी.

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्टेडियममध्ये न जाता घ्या स्टेडियमसारखा अनुभव, टी२० विश्वचषक सामन्यांचा थरार पाहा आता पीव्हीआरमध्ये

राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपद देण्याबाबत विराटने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला काहीच माहित…’

टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी राहुल चाहरला का दिली टीम इंडियात संधी? विराटचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---