आयपीएल (IPL) 2025चा मेगा लिलाव (IPL Mega Auction)) संपला आहे. या मेगा लिलावासाठी जागतिक क्रिकेटमधील एकूण 577 खेळाडूंना निवडण्यात आले होते. त्यापैकी 182 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या लिलावात 100 हून अधिक भारतीय खेळाडू विकले गेले. तर देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे खेळाडूही या मेगा लिलावात श्रीमंत होताना दिसले. या बातमीद्वारे आपण उत्तर प्रदेशातील त्या 8 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. ज्यांच्यावर आयपीएल 2025च्या मेगा लिलावादरम्यान बोली लावण्यात आली होती.
1) भुवनेश्वर कुमार- भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) यावेळी मेगा लिलावात मोठी रक्कम मिळाली आहे. मूळचा मेरठचा असलेल्या भुवनेश्वरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लिलावादरम्यान 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
2) नितीश राणा- भारतीय संघात खेळलेला दिल्लीचा स्टार फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) याचे उत्तर प्रदेशशीही संबंध आहेत. नितीश आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्तर प्रदेशात सामील झाला आहे. या युवा फलंदाजाला राजस्थान रॉयल्सने (RR) 4.20 कोटींमध्ये घेतले आहे.
3) समीर रिझवी- उत्तर प्रदेशचा युवा स्टार खेळाडू समीर रिझवीला (Sameer Rizvi) चेन्नई सुपर किंग्जने (CSK) गेल्या लिलावात मोठ्या रकमेत विकत घेतले होते. पण यावेळी समीरला मोठी बोली लागली नसली, तरी तो दिल्ली कॅपिटल्समध्ये (DC) 95 लाख रूपयांसह दिसणार आहे.
4) स्वस्तिक चिकारा- यूपी टी20 लीगमध्ये चमकदार कामगिरी करणारा युवा स्टार फलंदाज स्वस्तिक चिकाराही मेगा लिलावात विकला गेला. उत्तर प्रदेशच्या या फलंदाजाला आरसीबीने 30 लाख रुपयांना विकत घेतले आहे.
5) आर्यन जुयाल- उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी आर्यन जुयाल यालाही यावेळी मेगा लिलावात हिस्सा मिळाला आहे. लखनऊ सुपरजायंट्सने (LSG) या फलंदाजाला 30 लाख रूपयांमध्ये आपल्या संघात सामील केले आहे.
6) अभिनंदन सिंग- आयपीएलमधील यूपीच्या खेळाडूंमध्ये अभिनंदन सिंग देखील आहे. या युवा खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2025च्या मेगा लिलावादरम्यान विकत घेतले आहे. अभिनंदनला आरसीबीने 30 लाख रूपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
7) झीशान अन्सारी- उत्तर प्रदेश टी20 लीगच्या यंदाच्या हंगामात आपल्या फिरकीचा प्रभाव पाडणाऱ्या झीशान अन्सारीला सनरायझर्स हैदराबादने (SRH) विकत घेतले. झीशानला हैदराबादने 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.
8) विपराज निगम- स्टार युवा फिरकी गोलंदाज विपराज निगम, जो मूळचा यूपीची राजधानी लखनऊचा आहे, त्याला मेगा लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने (DC) विकत घेतले. विपराज 30 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह उतरला होता. दरम्यान दिल्लीने त्याला 50 लाख रुपयांना विकत घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
ICC Champions Trophy; पाकिस्तानच्या जिद्दीमुळे आयसीसीचे होणार भारी नुकसान?
“11 अविश्वसनीय वर्षांनंतर….”, हैदराबादपासून वेगळे झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारची भावुक पोस्ट
“खेळ तुम्हाला धडा शिकवतो…”, पृथ्वी शाॅबाबत रिकी पाँटिंगचे मोठे वक्तव्य!