fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कहर! २०११ विश्वचषकात धोनीने षटकार मारलेल्या चेंडूचा अखेर लागला शोध

9 Years Later The Ball That MS Dhoni Hit For Six In The 2011 World Cup Final Has Been Located

September 23, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


नवी दिल्ली। विश्वचषक २०११ मधील ऐतिहासिक अंतिम सामन्यादरम्यान तत्कालीन कर्णधार एमएस धोनीने विजयी षटकार ठोकला होता. आणि आपल्या संघाला दुसऱ्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकून दिला होता. त्यावेळी वानखेडे स्टेडिअममध्ये हरवलेला तो चेंडू शोधण्यासाठी आता भारतीय संघाचे दिग्गज माजी कर्णधार सुनील गावसकर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

चेंडू पकडणारा प्रेक्षक निघाला सुनील गावसकरांच्या ओळखीचा

ज्यावेळी चेंडूचा शोध घेणे सुरू होते, त्यावेळी गावसकरांनी एमसीएला सांगितले की, चेंडू पकडणारा प्रेक्षक हा त्यांच्या मित्राच्या ओळखीचा आहे.

योग्य स्थान आणि सामन्यातील चेंडू शोधण्याचे काम धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर म्हणजेच मागील महिन्यापासून सुरू झाले होते. एमसीएसच्या अपेक्स काऊंसिलचे सदस्य अजिंक्य नाईक यांनी धोनीला वानखेडे स्टेडिअममध्ये चेंडू ज्या ठिकाणी पडला होता, त्या जागेवर एक स्थायी सीट देऊन सन्मानित करण्याच्या विचारासहित नियामक मंडळाला पत्रही लिहिले होते.

एमसीए घेऊ शकते गावसकरांची मदत

एमसीएच्या एका सदस्याने सांगितले, “गावसकरांनी अंजिक्य यांना सांगितले की, त्यांचा मित्र त्या जागी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीला ओळखतो. आणि त्या व्यक्तीकडे चेंडूही आहे.”

अशी अपेक्षा केली जात आहे की, एमसीए गावसकरांशी त्या प्रेक्षकासोबत संपर्क साधण्याचीही विनंती करेल.

स्टेडिअममधील सीटला नाव देणे परदेशात साधारण बाब आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंड येथील ग्रँट एलियटच्या नावावर अशीच एक सीट आहे. ज्या ठिकाणी त्याने षटकार मारत आपल्या संघाला विश्वचषक २०१५ च्या अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला होता. त्यावेळी न्यूझीलंड संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा एंट्री केली होती.

सध्या धोनी यूएईमध्ये आयपीएल २०२० मध्ये आपल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने आपले सुरुवातीचे २ सामनेही खेळले आहेत. त्यात त्याच्या संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळविला, तर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात १६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानविरुद्ध धोनीने ३ षटकारही ठोकले.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…

-क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता करता येणार वानखेडे स्टेडियमची सफर

-‘या’ गोष्टीमुळे गमवावा लागला सामना, राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीची प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

-चेन्नई-राजस्थान सामन्यात बनले मोठे विक्रम, संजू सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद

-मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 

-दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम


Previous Post

धोनीने ‘या’ कारणासाठी घातला होता पंचाशी वाद, पण…

Next Post

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितने केला ‘हा’ दमदार विक्रम

Related Posts

Photo Courtesy: Twitter/narendramodi and BCCI
क्रिकेट

‘उत्कृष्ट हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प’, ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव! मोदींनीही केलं ट्विट

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

January 19, 2021
Screengrab : Twitter/@cricketcomau
क्रिकेट

व्हिडिओ : कर्णधार रहाणेचा आक्रमक अंदाज, नॅथन लाॅयनला ठोकला खणखणीत षटकार

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितने केला 'हा' दमदार विक्रम

Photo Courtesy: www.iplt20.com

मुंबईकर असूनही रोहितला न जमलेला विक्रम विंडीजच्या पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी केला

Screengrab: Twitter/KKRiders

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी रसलने तोडला कॅमेरा; पहा व्हिडिओ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.