---Advertisement---

अबब! तब्बल ९१व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार ‘हा’ खेळाडू

On: शनिवार, मे 15, 2021 6:36 PM
---Advertisement---

क्रिकेट खेळाप्रती असलेल्या प्रेमामुळे अनेक खेळाडू वर्षानुवर्षे क्रिकेट खेळत असलेले दिसतात. अगदी वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत देखील खेळाडू स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असलेले दिसतात. मात्र तुम्हाला आजच्या लेखात आम्ही अशी गोष्ट सांगणार आहोत ज्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तब्बल ९१ व्या वर्षी एक खेळाडू क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

ऑस्ट्रेलियात ही घटना घडली आहे. या खेळाडूचे नाव आहे डग क्रॉवेल. क्रिकेटवरच्या प्रेमामुळे ते तब्बल ९१व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहेत. ज्येष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत ते खेळतांना दिसतील. ऑस्ट्रेलियात ज्येष्ठांची क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते, त्यात ६० पेक्षा अधिक वर्षांचे खेळाडू भाग घेतात. यात गेल्या १५ वर्षांपासून डग क्रॉवेल भाग घेत आहेत.

याबाबत बोलतांना क्रॉवेल म्हणाले, “ही स्पर्धा त्या लोकांसाठी आहे, जे ३० वर्षाच्या आसपास क्रिकेट खेळणे सोडून देतात. पण त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा कायम राहते आणि ते स्वतःला फिट ठेवतात.”
या स्पर्धेच्या वेगळेपणा बद्दल बोलतांना ते म्हणाले, “चेंडू आता तेवढ्या वेगाने बॅटवर येत नाही. जेवढा पूर्वी येत असायचा. आता शॉट मारणे सोपे झाले आहे कारण चेंडू धीम्या गतीने येतो.”

अनेक खेळाडू वयाच्या ३०व्या वर्षी निवृत्ती घेतात, मात्र त्याचवेळी क्रॉवेल ९०व्या वर्षी देखील स्वतःला फिट मानतात. या वयातही मैदानावर येऊन दमदार फलंदाजी करण्याचा आणि गोलंदाजी करण्याचा आत्मविश्वास त्यांना आहे. ते म्हणाले, “मी म्हणत राहतो की मी अजून काही वर्षे खेळू शकतो. मात्र काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मी अजूनही फिट आहे आणि खेळाचा आनंद लुटतो आहे. ज्यावेळी माझी निवड होईल, त्यावेळी मी नक्कीच खेळायला जाईल.”

https://twitter.com/abc730/status/1391695901937213447?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1391695901937213447%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-91-year-old-australian-cricketer-doug-crowell-set-back-cricket-field

त्यांच्या युवा वयात क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना अनेक अडचणी आल्या होत्या. योग्य सोयीसुविधांचा अभाव होता, तसेच त्यांच्या समुदायासाठी कुठला क्लब देखील नव्हता. मात्र याही कठीण परिस्थितीत त्यांनी क्रिकेट खेळण्याची जिद्द ठेवली. याच जिद्दीने ते आजही ९१व्या वर्षी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. क्रिकेटवर त्यांचे निस्सीम प्रेम असून शक्य होईल तितका काळ क्रिकेट खेळत राहण्याची इच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये खेळलेल्या इंग्लडच्या खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत मिळणार नाही संधी?

व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णासाठी देवदूत बनला युजवेंद्र चहल, ‘अशाप्रकारे’ केली मदत

लॅब्यूशेनला गोलंदाजी करणे म्हणजे क्लबमधील एखाद्या मुलीला इंप्रेस करण्यासारखे, अँडरसनची अजब प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---