---Advertisement---

“थोडी वाट पाहा, या वर्षाअखेर तो टीम इंडियात दिसेल,” माजी क्रिकेटरचा दावा

On: मंगळवार, ऑक्टोबर 13, 2020 6:04 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२०चा भाग असलेले राहुल तेवतिया, संजू सॅमसन असे कित्येक युवा खेळाडू एकापेक्षा एक जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. मुंबई इंडियन्स संघाचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादवनेही त्याच्या अफलातून प्रदर्शनाने सर्वांची मने जिंकली आहेत. रविवारी (११ ऑक्टोबर) अबु धाबी येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने ५३ धावांची खेळी केली होती. त्याच्या या सातत्याने चालू असलेल्या शानदार फलंदाजी प्रदर्शनाला पाहता भारतीय समालोचक आकाश चोप्राने त्याला भारतीय क्रिकेट संघाचा उभरता खेळाडू म्हटले आहे.

सूर्यकुमार ठरला गेम चेंजर

आपल्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू चोप्रा म्हणाला की, “मला वाटते सूर्यकुमार यादव रविवारी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात गेंम चेंजरच्या रुपात दिसून आला. त्याची फलंदाजी करण्याची पद्धत, त्याने मारलेले जोरदार शॉट्स असो किंवा मग कट शॉट्स असो, सर्वकाही अप्रतिम आहे.”

सूर्यकुमार बनेल भारतीय संघाचा भाग

पुढे बोलताना चोप्रा म्हणाला की, “सूर्यकुमारने ज्याप्रकारे कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर जोरदार षटकार लगावला होता, त्यावरुन माझी नजरच हटत नव्हती. त्या षटकाराला पाहून मला इतका आनंद झाला की, मी तो शब्दात व्यक्तच करु शकत नाही. पण एवढे मात्र म्हणेल की, त्याने भारतीय संघाकडून खेळायला पाहिजे.”

मी मनापासून बोललेली गोष्ट नक्कीच खरी ठरेल

“हे वर्ष संपेपर्यंत सूर्यकुमार नक्कीच भारतीय संघाचा भाग असेल आणि मला वाटते की तो भारताकडून खूप सामने खेळेल. त्याच्यासाठीचे हे उद्गार माझ्या मनातून निघाले आहेत. त्यामुळे मला वाटत आहे की, नक्कीच मी म्हटलेली ही गोष्ट खरी ठरेल,” असे शेवटी बोलताना चोप्राने सांगितले.

सूर्यकुमारने आतापर्यंत आयपीएलच्या तेराव्या हंगामात ७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने तब्बल २३३ धावा ठोकल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---