भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने (MS Dhoni) जानेवारीपर्यंत त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल त्याला काहीही विचारू नये, असे म्हटले आहे.
पण भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटले आहे की रिषभ पंत (Rishabh Pant) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) नजीकच्या काळात कशी कामगिरी करतात याकडे धोनी लक्ष ठेवून असेल.
“मला वाटते की पंत आणि सॅमसनची कामगिरी पाहण्याची धोनी संयमाने वाट पाहील. आयपीएलनंतर तो पुनरागमनाबद्दल निर्णय घेईल. कारण ज्याप्रकारे मी पाहत आहे, धोनी आयपीएलसाठी स्वत: ला तयार करत आहे,” असे व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) स्टार स्पोर्ट्सला सांगितले.
“मला खात्री आहे तो यावेळीही सीएसकेसाठी(चेन्नई सुपर किंग्स) खेळताना आणि नेतृत्व करताना चांगली कामगिरी करेल, जशी तो नेहमी करतो,” असेही लक्ष्मणने म्हणाला.
विशेष म्हणजे, भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही काही दिवसांपूर्वी हे स्पष्ट केले होते की धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अद्याप संपलेली नाही. तो आयपीएलमध्ये कसा खेळेल हे पहावे लागेल.
धोनी भारताकडून शेवटचे 2019 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला आहे. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतलेली आहे.
फलंदाजीला जाण्याआधी वॉर्नर, बर्न्स खेळत होते हा खेळ, व्हिडिओ झाला व्हायरल
वाचा👉https://t.co/tWd5y5d0oI👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #AUSvsPAK #DavidWarner #JoeBurns— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
टीम इंडियाविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी असा आहे विंडीज संघ
वाचा👉https://t.co/MTa4Dv58p2👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019