भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघे एकमेकांना डेट करतात अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अथियाने एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने केएल राहुलचे जॅकेट घातले असल्याचा दावा अनेक चाहत्यांनी केला होता. तसेच असाही कयास लावला जात होता की सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे, त्यामुळे अथिया देखील केएल राहुलसोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे.
आता पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चांना जोर आला आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. नुकताच केएल राहुलने अथियाबरोबरचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
यापूर्वीही अथिया आणि केएल राहुल नेहमी एकमेकांचे फोटो पोस्ट करत असतात. तर कधी कधी एकमेकांच्या फोटोवर विशिष्ठ अंदाजात कॉमेंट देखील करतात. परंतु, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत ही गोष्ट अजून त्यांनी जाहीर केलेली नाही.
अथिया आणि केएल राहुलने इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये दोघांचेही चष्मे उठून दिसत आहेत. तसेच एका ब्रँडच्या जाहीरातीसाठी हे फोटोशूट केल्याचे त्यांनी सांगितले आहे. या फोटोमध्ये केएल राहुल काळया रंगाचा ब्लेझर आणि पांढऱ्या रंगाचा हाईनेकमध्ये हँडसम दिसत आहे. तर अथिया गडद निळा आणि पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
NUMI Paris promises to encourage a kinder, loving and bolder side of the #NewMe. Proud to partner with @theathiyashetty for @NumiParis.
Get your #NewMe!
On every purchase, NUMI Paris pledges support to L V Prasad Eye Institute.
Buy now: https://t.co/JMXBBoDb1z pic.twitter.com/m8QJIvyu9I— K L Rahul (@klrahul) June 16, 2021
सध्या केएल राहुल भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. परंतु केएल राहुलला कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या 15 खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. भारतीय संघ 18 जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडमध्ये हा अंतिम सामना खेळणार आहे.
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी 5 खेळाडूंचा भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुरा, इशांत शर्मा, मोहमद शमी,मोहमद सिराज, उमेश यादव आणि हनुमा विहारी.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनची बातच न्यारी! पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर रोहितचे भन्नाट उत्तर
इंग्लिशसह ‘या’ भारतीय भाषांमध्ये होणार WTC Final चे थेट प्रसारण; मराठीचा मात्र समावेश नाही
अरेरे! पावसात ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल