आजपासून(22 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे.
या सामन्यात विजय मिळवून भारताचा कर्णधार विराट कोहलीला माजी कर्णधार एमएस धोनीच्या एका खास विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
जर या सामन्यात भारताने विजय मिळवला तर विराटचा कसोटी कर्णधार म्हणून हा 27 वा विजय ठरेल. त्यामुळे तो भारताकडून कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या धोनीच्या विक्रमाची बरोबरी करेल. धोनीनेही कसोटीमध्ये कर्णधार म्हणून 27 विजय मिळवले आहेत.
सध्या विराट कोहलीने भारताचे कसोटीत नेतृत्व करताना 46 सामन्यात 26 विजय मिळवले आहेत. तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याचबरोबर 10 सामन्यात पराभव स्विकारावा लागलेला आहे.
याबरोबरच भारताचे कसोटीत सर्वाधिक सामन्यात नेतृत्त्व करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीतही विराट आज मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनील गावस्कर यांची बरोबरी करेल. या दोघांनीही भारताचे प्रत्येकी 47 कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर धोनी आहे. धोनीने 60 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे.
#कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार-
27 – एमएस धोनी (60 सामने)
26 – विराट कोहली (46 सामने)
21 – सौरव गांगुली (49 सामने)
14 – मोहम्मद अझरुद्दीन (47 सामने)
9 – सुनील गावस्कर (47 सामने)
9 – मन्सूर अली पतौडी (40 सामने)
#भारताचे सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारे क्रिकेटपटू –
60 – एमएस धोनी
49 – सौरव गांगुली
47 – सुनील गावस्कर
47 – मोहम्मद अझरुद्दीन
46 – विराट कोहली
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधीच विंडीजला मोठा धक्का!
–भारत-विंडीज संघात आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीबद्दल सर्वकाही…
–कर्नाटकला दोनदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा विनय कुमार आता खेळणार या संघाकडून