वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यादरम्यान २२ जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन करेल. नुकताच इंग्लंड दौरा संपवून आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आले आहे. शिखरच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. त्याचवेळी भारतीय संघाकडे या मालिकेत काही विश्वविक्रम करण्याची संधी आहे.
भारतीय संघाची या छोट्याशा मालिकेत दोन मोठ्या विश्वविक्रमांवर नजर असेल. २००७ पासून भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही.गेल्या १५ वर्षात भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ११ वेळा वनडे मालिकेत पराभूत केले आहे. कमीत कमी तीन सामन्यांच्या मालिकेत कोणत्याही एका संघाला सर्वाधिक मालिकांत पराभूत करण्याच्या बाबतीत भारत पाकिस्तानसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानने १९९६ ते २०२० पर्यंत सलग ११ मालिकांमध्ये झिम्बाब्वेचा पराभव केला आहे. भारतीय संघाने ही तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकली तर तो एक विश्वविक्रम ठरेल.
याबरोबरच भारतीय संघाला दुसरा एक विश्वविक्रम देखील खुणावत आहे. तो विश्वविक्रम म्हणजे एकाच मैदानावर सर्वाधिक वनडे विजयांचा. पोर्ट ऑफ स्पेन येथील स्टेडियमवर खेळलेल्या ११ पैकी ९ वनडे सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर पहिल्या वनडेत सामन्यात भारताने यजमान संघाला पराभूत करण्यात यश मिळवले तर, तो एका मैदानावर सर्वाधिक विजय/पराजय गुणोत्तर असलेला संघ बनेल. आत्तापर्यंत भारतीय संघ या विश्वविक्रमात देखील संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचे हरारेमध्ये विजय/पराजय गुणोत्तर भारताच्या बरोबरीचे आहे. पोर्ट ऑफ स्पेनशिवाय भारताने हरारे येथे देखील अशाच प्रकारची आपली उज्वल कामगिरी केलीये.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvWI: ‘गुरु’ द्रविड यांचा मास्टर स्ट्रोक! नेटमध्ये चक्क लोकल गोलंदाजाकडून करून घेतली गोलंदाजी
बीसीसीआयचे ८६.२१ कोटी देण्यास बायजूसचा नकार?, पेटीएमही सोडणार स्पॉन्सरशिप, वाचा संपूर्ण प्रकरण