गुरुवारी (30 मार्च) चेन्नई सुपर किंग्ज संघाला अजून एक धक्का बसला. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आगामी एआयपीएल हंगामातील एकही सामना खेळणार नाहीये. पाठीच्या दुखापतीमुळे चौधरीला संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. मागच्या काही दिवसांपासून मिकेशच्या दुखापतीविषयी चर्चा सुरू होती. गुरुवारी त्याने हंगामातून मघार घेतल्याचे समोर आले. मुकेशने माघार घेतल्यानंतर सीएसकेचे गोलंदाजी आक्रमण खूपच कमजोर झाल्याचे दिसते.
मुकेश चौधरी (Mukesh Chaudhary ) याने आपला शेवटचा सामना डिसेंबर 2022 मध्ये खेळला होता. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील हा विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळल्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून मुकेश दुखापतीमुळे त्रस्त आहे. सध्या तो बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या दुखापतीवर काम करत आहे. आयपीएल 2023 साढी झआलेल्या लिलावात सीएसकेने त्याला 20 लाख रुपयांमध्ये रिटेन केले होते. दरम्यान, एनसीएत दाखल होण्याआधीत मुकेश मार्च महिन्याच्या सुरुवातील सीएसकेच्या कॅम्पमध्ये दाखल झाल्याचेही समजले होते.
सीएसकेसाठी मुकेश चौधरीची ही दुखापत मोठी दोडेदुखी ठरणार आहे. याआधी सीएसकेचा महत्वाचा वेगवान गोलंदाज कयल जेमिसन देखील पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. तसेच संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चाहर देखील आपल्या दुखापतीतून सावरला नाहीये.
दरम्यान, मागच्या आयपीएल हंगामात मुकेश चौधरीचे प्रदर्शन जबरदस्त राहिली होते. त्याने हंगामात खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 9.31 राहिला होता. या हंगामातील 13 पैकी 11 विकेट्स मुकेशने पावरप्लेदरम्यान घेतल्या होत्या. संघासाठी त्याचे हे प्रदर्शन महत्वाचे ठरले होते. दरम्यान, आगामी हंगामातील पहिला सामना सीएसकेचाच आहे. 31 मार्च रोजी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात सीएसके आणि गतविजेता गुजराद टायटन्स संघ आमने सामने असेल. (Mukesh Chaudhary ruled out of IPL 2023 due to injury)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! सचिनचा लेक गाजवणार आयपीएल 2023? स्वतः रोहित म्हणाला…
IPLपूर्वी मुंबईच्या नवीन हेड कोचची विरोधी संघांना चेतावणी; म्हणाला, ‘मी काय इथे तिसऱ्या अन् चौथ्या…’