आगामी काळात भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना तसेच इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघावर या दौऱ्यात शानदार कामगिरी करण्याची अपेक्षा असणार असून,त्यामुळे खेळाडूंवर दबाव देखील वाढणार आहे. आपण या लेखात बघणार आहोत असे 3 भारतीय खेळाडू ज्यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत व इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत सुमार कामगिरी केली असता कसोटी संघातून बाहेर केले जावू शकते.
1)केएल राहुल- वर्तमान भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर केएल राहुलला प्रमुख फलंदाज मानले जाते. केएल राहुल बऱ्याच काळापासून भारतीय संघात खेळत असून, जो आता पूर्णपणे परिपक्व फलंदाज बनला आहे. पण तरीदेखील राहुलला भारताच्या कसोटी संघात आपले स्थान पक्के करता आलेले नाही. राहुलकडे इंग्लंड दौऱ्यात स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. मात्र जर राहुलने ही संधी दवडली, तर त्याला कसोटी संघातील आपले स्थान गमवावे लागणार हे जवळपास निश्चित आहे.
2)वृद्धिमान साहा- माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर, वृद्धिमान साहाला कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकाची भूमिका देण्यात आली. साहाने देखील मिळालेल्या संधीचा फायदा उचलत, यष्टिरक्षणात व फलंदाजीत शानदार कामगिरी केलेली आहे. मात्र मागील काही काळात त्याला झालेली दुखापत व रिषभ पंतचा शानदार फॉर्म यामुळे त्याचे कसोटीतील अंतिम अकरा मधील स्थान डळमळीत झाले आहे. वृद्धिमान साहाच्या वाढत्या वयाबरोबरच पंतचा झालेला उदय त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. साहासाठी देखील इंग्लंड दौरा शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका ठरू शकते.
3)उमेश यादव- गेल्या काही वर्षात भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी खूपच प्रभावी ठरली आहे. भारतीय संघात 5 ते 6 अतिशय उत्तम गोलंदाज असून एकावेळी केवळ 3 किंवा 4 गोलंदाजच खेळू शकतात. त्यामुळे उमेश यादव सारख्या शानदार गोलंदाजाला भारतीय संघात पुरेशी संधी मिळत नाहीये. मोहोम्मद सिराज व शार्दुल ठाकूर सारख्या युवा गोलंदाजांचे संघात आगमन झाल्यामुळे उमेशवर दबाव वाढला असून त्याला देखील संघातील स्थान वाचवण्यासाठी उत्तम कामगिरी करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यासाठी हर्षा भोगलेंनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, पाहा कोणाला दिली संधी
वाढदिवशी पण शास्त्री गुरूजी ट्विटरवर ट्रोल, पाहा काही भन्नाट मिम्स
५ कमनशिबी कर्णधार, ज्यांना केवळ एकाच टी२० सामन्यात मिळाली नेतृत्वाची संधी