येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian premier league 2022) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केलेला विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner)आता दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला ६.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०१६ स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. दरम्यान आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएल २०१८ स्पर्धेत केन विलियमसनने (Kane Williamson) सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी डेविड वॉर्नर बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकला होता. डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरने बुधवारी (१६ फेब्रुवारी ) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने केन विलियमसन आणि आपल्या मुली सोबत नाश्ता करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने लिहिले की, “मला विलियमसन सोबत एकत्र नाश्ता करण्याची आणि क्रिकेट खेळण्याची खूप आठवण येईल.”
डेविड वॉर्नर हा आयपीएल स्पर्धेतील विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत एकूण ९५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५० च्या सरासरीने ४०१४ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण २ शतक आणि ४० अर्धशतक झळकावले आहेत. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली संघाकडून केली होती. आता आगामी हंगामात तो याच संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.
https://www.instagram.com/p/CaB_OcgLafC/?utm_source=ig_web_copy_link
अशी राहिली आहे डेविड वॉर्नरची कारकीर्द
ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डेविड वॉर्नरने आतापर्यंत एकूण ९१ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २४ शतकांच्या मदतीने एकूण ७५८४ धावा केल्या आहेत. तर १२८ वनडे सामन्यांमध्ये त्याने ५४५५ धावा केल्या आहेत. तसेच ८८ टी२० सामन्यांमध्ये १४०.४८ च्या सरासरीने २५५४ धावा केल्या आहेत. तसेच एकूण टी२० कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ३१३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १०३०८ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतक आणि ८५ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय विजयाचे ‘३’ शिल्पकार,ज्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत करण्यात बजावली मोलाची भूमिका