येत्या १९ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिज संघ इंग्लंडमध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेत वेस्ट इंडिज संघ २-१ ने आघाडीवर आहे. असे असताना वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंमध्ये मतभेद सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान याबाबत क्रिकेट वेस्ट इंडिजने मोठा खुलासा केला आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजचे (cricket West Indies) अध्यक्ष रिकी स्कॉरिट यांनी म्हटले की, ” मला तर वाटते हे, वेस्ट इंडिजच्या कर्णधाराच्या विश्वासार्हतेवर एक आक्रमण केल्यासारखे आहे. ज्याचा वापर आमच्या संघात मतभेद निर्माण करण्यासाठी केला जात आहे. वेस्ट इंडिज संघाने मजबूत संघाविरुद्ध टी२० मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात १ धावेने पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेत कर्णधाराला बदनाम करून हा संघाला खिळखिळी करण्याचा हा प्रयत्न खपवून घेतला जाऊ नये.”
वेस्ट इंडिज संघ इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या टी२० मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथा सामना शनिवारी (२९ जानेवारी ) आणि मालिकेतील अंतिम सामना रविवारी (३० जानेवारी ) रोजी पार पडणार आहे. ही मालिका झाल्यानंतर वेस्ट इंडिज संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे कर्णधारपद कायरन पोलार्डकडे (Kieron Pollard) सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :
कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ॲलन, एनक्रुमाह बोनर, डॅरीन ब्रावो, शमाराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श जूनियर.
महत्वाच्या बातम्या :
मुंबईकडे आयपीएल २०२२ चे यजमानपद! बीसीसीआयने केला आयोजनाचा मास्टरप्लॅन
हे नक्की पाहा: