यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) पाकिस्तान संघ बाबर आझमच्या (Babar Azam) कर्णधारपदात काही खास कामगिरी करु शकला नाही. तत्पूर्वी पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आझम (Azam Khan) खानच्या फिटनेसबद्दल खूप चर्चा होताना दिसत आहेत. टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात आझम खान शून्यावर बाद झाला. त्यानंतर त्याला भारताविरुद्धच्या सामन्यात संघात निवडलं नाही. परंतु आता पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफीजनं त्याच्या फिटनेसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मोहम्मद हाफीज (Mohammed Hafeez) म्हणाला, “आझम खान (Azam Khan) तुला जर पाकिस्तान क्रिकेट संघात खेळायचं असेल तर तुला दोन कामं करावी लागतील. सगळ्यात आधी तुला तुझ्या शरीराला फीट ठेवावं लागेल आणि जास्त मेहनत घ्यावी लागेल. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे आणि दुसरी संधी मिळाल्यानंतर जोरदार प्रदर्शन करावं लागेल. तू तुझ्या फिटनेसशिवाय चांगलं क्षेत्ररक्षण करु शकत नाही.”
पुढे बोलताना मोहम्मद हाफीज (Mohammed Hafeez) म्हणाला, “आझम खाननं (Azam Khan) त्याच्या फॅट लेव्हलवरती काम केलं पाहिजे. जोरदार धावलं पाहिजे. त्याचा धावण्याचा वेग संघातील सर्व खेळाडूंपेक्षा 2 पटीनं कमी असतो. जर संघातील सर्व खेळाडू 10 मिनिटात 2 किलोमीटर धावत असतील, तर त्याला 2 किलोमीटर धावण्यासाठी 20 मिनिट वेळ लागतो. मी त्याला याच्याबद्दल बऱ्याच वेळा बोललो आहे.”
मोहम्मद हाफीजनं (Mohammed Hafeez) पाकिस्तानसाठी 55 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 3,652 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 224 राहिली आहे. तर 218 एकदिवसीय सामन्यात त्यानं 32.90च्या सरासरीनं 6,614 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या 140 नाबाद राहिली आहे. पाकिस्तानसाठी त्यानं 119 टी20 सामने खेळले, यामध्ये त्यानं 122.03च्या स्ट्राईक रेटनं 2,514 धावा ठोकल्या. त्यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या 99 राहिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 21 शतक झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही कोणत्याही संघाचा…” सुपर 8 साठी पात्र ठरल्यानंतर अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकानं दिली प्रतिक्रिया
सुपर-8 मध्ये तीन जागांसाठी सात संघात रस्सीखेच! इंग्लंड-पाक नशिबावर अवलंबून
फ्लोरिडामध्ये पूरसदृश परिस्थिती, भारत-कॅनडा सामन्यावर पावसाचे सावट!