आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने-सामने येतील. रविवारी (16 एप्रिल) मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना मुंबई इंडियन्स फ्रॅंचाईजीने लक्षवेधी करण्याचा निर्णय घेतला असून, या सामन्यात नारीशक्तीचा जागर झालेला दिसेल. मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी यांनी याबाबत घोषणा केली.
Chalo Paltan, Kal #ESADay saath mai dekhenge! 😍
19,000 young girls will be inspired by the women's and men’s team members who will be present there 🫶#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 MI TV pic.twitter.com/BZLeA5Lqe0
— Mumbai Indians (@mipaltan) April 15, 2023
पहिले दोन सामने गमावल्यानंतर मुंबईने तिसऱ्या सामन्यात दिल्लीला पराभूत करत आपल्या गुणांचे खाते उघडले. त्यानंतर घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्स ‘वुमेन इन स्पोर्ट्स’ या मोहिमेला पाठिंबा दर्शवणार आहे. नीता अंबानी यांनी या मोहिमेची माहिती देताना सांगितले,
“दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही महिला सक्षमीकरण व मुलींचा खेळातील सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न करत आहोत. यावेळी आम्ही हजारो मुलींना स्टेडियममध्ये बोलवत आहोत. त्याचवेळी WPL मध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या मुंबई इंडियन्स संघाची जर्सी खेळाडू केकेआरविरुद्धच्या सामन्यात परिधान करतील. यासोबतच मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर नाणेफेकी वेळी रोहित शर्मासह मैदानावर उभी असेल.” मुंबई इंडियन्सने मागील महिन्यात झालेल्या पहिल्या वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.
मुंबई इंडियन्सला आपल्या पहिल्या दोन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व चेन्नई सुपर किंग्स यांनी पराभूत केले होते. मात्र, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला होता.
रिलायन्स फाउंडेशनच्या एज्युकेशन फॉर ऑल या मोहिमेअंतर्गत दरवर्षी अनेक मुलींना मुंबई इंडियन्सचा एक सामना मोफत पाहण्याची संधी उपलब्ध केली जाते. मुंबई इंडियन्स या व्यतिरिक्त अनेकही उपक्रम आयोजित करत नेहमी चाहत्यांना आपल्या संघाशी जोडून ठेवतात.
(Mumbai Indians Wear WPL Jersey Against KKR At Wankhede Stadium Harmanpreet Kaur Attend Toss)