भारतीय क्रिकेट संघाला येत्या २८ ऑगस्टपासून आशिया चषक २०२२ स्पर्धा खेळायची आहे. ही स्पर्धा टी२० स्वरूपात होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ ही स्पर्धाही रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी पुढे येत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी२० विश्वचषकालाही मुकण्याची शक्यता आहे.
बुमराहच्या (Jasprit Bumrah) त्याच्या पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे आशिया चषकात (Asia Cup 2022) खेळता येणार नसल्याने त्याची १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आलेली नाही. यानंतर आता तो टी२० विश्वचषकासाठीही (T20 World Cup 2022) उपलब्ध राहण्यावर शंका आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने याबद्दल माहिती देताना बुमराहची जुनी दुखापत चिंतेचा विषय असल्याचे सांगितले आहे.
इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “हो, हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. तो बेंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमासाठी परतला आहे. त्याला येथे उपलब्ध सर्वोत्तम उपचार मिळतील. परंतु सर्वात मोठी समस्या ही आहे की, त्याची दुखापत खूप जुनी आहे आणि हाच चिंतेचा विषय आहे.”
“टी२० विश्वचषकासाठी आमच्या हातात फक्त २ महिने उरले आहेत. आणि बुमराहला अतिशय वाईट वेळी ही दुखापत झाली आहे. आम्ही त्याच्या तब्येतीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. तो सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे. सध्या त्याला सावधानीने स्थितीला सांभाळावे लागेल,” असेही त्यांनी म्हटले.
बुमराहबरोबरच आणखी एक भारतीय गोलंदाज आहे जखमी
दरम्यान बुमराहव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यालाही दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडावे लागले आहे. अशात संयुक्त अरब अमिरातीत (युएई) होणाऱ्या आशिया चषकासाठी ३ वेगवान गोलंदाजांना नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये एकटा भुवनेश्वर कुमार अनुभवी आहे. तर युवा गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनाही आशिया चषकासाठी निवडण्यात आले आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मांजरेकरांनी पुन्हा काढली जडेजाची खोड; म्हणाले, “त्याला स्वतःलाच…”
हंड्रेड लीगच्या ‘वंडर बॉय’ स्मिडला लागली लॉटरी; ‘एमआय फॅमिली’ने दिली ही ऑफर
ब्रेकींग! टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बदलला कर्णधार; शिखरची गच्छंती तर…