शुक्रवारपासून (१४ जानेवारी) वेस्ट इंडिजमध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (Icc under19 world cup) थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ कसून सराव करत आहेत. तसेच ही स्पर्धा ४ गटांमध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान, काही कारणास्तव या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. काय आहे तो बदल? चला जाणून घेऊया.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेची सुरुवात १४ जानेवारी पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज (Australia vs west indies) यांच्यातील सामन्याने होणार आहे. याच दिवशी श्रीलंका आणि स्कॉटलॅंड संघ देखील आमने-सामने येणार आहेत. तसेच भारतीय संघ १५ जानेवारी रोजी आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध (India vs South Africa) खेळणार आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान संघ वेस्ट इंडिजमध्ये उशिराने दाखल झाल्याने ‘ग्रुप सी’च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या ग्रुपमधील ६ पैकी ४ सामन्यात बदल करण्यात आला आहे.
आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रवासासाठी आवश्यक व्हिसा मिळाल्यानंतर अफगाणिस्तान संघ वेस्ट इंडिजला पोहोचेल आणि विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करेल. आम्हाला आनंद आहे की, अफगाणिस्तानने आवश्यक व्हिसा मिळवला आहे आणि ते स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्व सामने निर्धारित वेळेत व्हावेत यासाठी आम्ही सी ग्रुपचे वेळापत्रक बदलले आहे. सर्व स्पर्धक सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
या समितीमध्ये आयसीसीचे टूर्नामेंट हेड ख्रिस टेटली, आयसीसीचे वरिष्ठ इव्हेंट मॅनेजर फवाझ बक्श, स्पर्धेचे निर्देशक रोलँड होल्डर आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे प्रतिनिधी ॲलन विल्किन्स आणि रसेल अर्नोल्ड यांचा समावेश आहे. अफगाणिस्तान संघ उशिराने वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाल्यामुळे त्यांना सराव सामने खेळण्याची संधी मिळणार नाहीये. हा संघ सराव सामने न खेळता मैदानात उतरणार आहे.
वेळापत्रकात बदल झाल्यानंतर असे आहे ‘ग्रुप सी’चे वेळापत्रक
१५ जानेवारी: झिम्बाब्वे विरुद्ध पापुआ न्यू गिनी
१७ जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
१८ जानेवारी: अफगानिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनी
२० जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान
२२ जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनी
२२ जानेवारी: अफगानिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
महत्वाच्या बातम्या :
दक्षिण आफ्रिकेचा सुपरमॅन! किगन पीटरसनने हवेत झेपावत घेतला पुजाराचा भन्नाट एकहाती झेल
हे नक्की पाहा :