पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने लाहोर येथील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ११५ धावांनी जिंकत १-० च्या फरकाने कसोटी मालिकाही जिंकली आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर हा थेट मैदानी पंचांशी भिडला आहे. यादरम्यान त्याने पंचांशी साधलेला संवादही स्टंप माईकमध्ये कैद झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर वॉर्नरची चर्चा होत आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या (PAK vs AUS Third Test) चौथ्या दिवशी (२४ मार्च) पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज वॉर्नरला (David Warner) मैदानी पंचांकडून डेंजर एरियामध्ये आल्यामुळे चेतावणी देण्यात आली होती. यावर वॉर्नरने पंचांना नियमांचे पुस्तक दाखवण्याचे भाष्य (David Warner Clashed With Umpire) केले होते.
हा प्रसंग ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील २१ व्या षटकादरम्यान घडला होता. मैदानी पंच अलीम डार आणि ऐहसान रजा यांनी फलंदाजी करत असलेल्या वॉर्नरला डेंजर एरियामधून पळाल्यामुळे चेतावणी दिली होती. मात्र यावर वॉर्नरने पंचांनाच उलट उत्तर देत म्हटले की, तो खेळपट्टीच्या बाहेरही फलंदाजी करण्याचा हक्कदार आहे. यासंदर्भात तो विरोधी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यासोबत बोललाही होता.
वॉर्नरचे संभाषण स्टंप माईकमध्ये कैद झाले असून तो म्हणतो आहे की, “तुमची इच्छा आहे की मी माझा फटका अशा पद्धतीने खेळावा.” हे वाक्य म्हणताना त्याने खेळपट्टीकडे इशारा केला होता. यावर उत्तर देताना पंच रजा म्हणाले होते की, “हो, तुला हालावे लागेल.” यावर वॉर्नर म्हणतो की, “मला नियमांच्या पुस्तकात दाखवा की, मला नेमके काय करावे लागेल. मी तेव्हापर्यंत फलंदाजी करणार नाही, जेव्हापर्यंत तुम्ही मला नियमांचे पुस्तक दाखवणार नाही.”
वॉर्नर आणि मैदानी पंचांमधील या प्रसंगामुळे सामना काही मिनिटे थांबवला गेला होता. मात्र नंतर लगेचच सामना पुन्हा सुरू केला गेला होता.
दरम्यान वॉर्नरला या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयात जास्त योगदान देता आले नव्हते. तो पहिल्या डावात केवळ ७ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. तो १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५१ धावांवर बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने सीएसकेची कॅप्टन्सी सोडल्यानंतर व्हायरल होतोय ‘हा’ जुना व्हिडिओ, पाहा काय म्हणालाय ‘थाला’
धोनीने विराटप्रमाणेच सोडले संघाचे कर्णधारपद, पाहा दोघांच्या निर्णयात काय आहे साम्य
आयपीएल २०२२च्या उद्घाटन सामन्यात भिडणार सीएसके अन् केकेआर, पाहा उभय संघांचे हेड-टू-हेड रेकॉर्ड्स