राजस्थान रॉयल्स संघाचा युवा फलंदाज रियान पराग हा या हंगामात खराब फॉर्ममुळे सातत्याने चर्चेत आहे. त्याच्या संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर चाहत्यांपासून ते रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांपर्यंत अनेकांनी टीकास्त्र डागले आहे. अशात राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक कुमार संगकारा याने रियानच्या कामगिरीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मान्य केले आहे की, पराग तितक्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. तसेच, याबाबत चर्चा केली जाईल.
काय म्हणाला संगकारा?
सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने रियान पराग (Riyan Parag) याच्या खराब फॉर्मविषयी चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, “रियान पराग याला त्या परिस्थितीत जाऊन जास्तीत जास्त षटकार मारायचे होते. त्याच्याबाबत योजना एकदम स्पष्ट होती. आमच्याकडे ध्रुव जुरेल आहे, जो वेगवान गोलंदाजांविरुद्ध फटके मारू शकतो. आम्हाला मधल्या फळीत 2-3 षटकारांची गरज होती. पराग नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत आहे. आम्हाला आमच्या खेळाडूंना सातत्याने पाठिंबा द्यावा लागले. दुर्दैवाने तो चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. आम्ही यावर विचार करू आणि पाहू की सुधारणेची गरज कुठे आहे.”
रियान परागची खराब कामगिरी
रियान पराग याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 12 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 षटकारही मारला. मात्र, त्याला संघाला सामना जिंकून देता आला नाही. राजस्थान संघ शेवटच्या षटकात येऊन पराभूत झाला. पराग फलंदाजीसाठी 16व्या षटकात आला होता. त्यावेळी संघाला विजयासाठी 51 धावांची गरज होती. पराग फिनिशर म्हणून खेळतो आणि त्याच्याकडून सामना संपवण्याची अपेक्षा होती. मात्र, असे काहीच घडले नाही. त्याने 1 चौकार आणि 1 षटकार मारला. अशाप्रकारे त्याने 10 चेंडूत फक्त 5 धावा केल्या. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
खरं तर, रियान पराग आणि कर्णधार संजू सॅमसन या दोन्ही खेळाडूंचा फॉर्म या हंगामात आतापर्यंत राजस्थानसाठी चिंतेचा विषय आहे. (head coach kumar sangakkara reacts on riyan parag bad form ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमधील अंडररेटेड आणि सर्वोत्तम खेळाडू कोण? विराटने घेतली दिग्गजांची नावे
राजस्थानला पराभूत केल्यानंतर राहुलचे खळबळजनक भाष्य; म्हणाला, ‘मी कर्णधार म्हणून काहीतरी चुकीचं…’