ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकासाठी आता आठ संघाची नावे अंतिम झाली आहेत. आयर्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने, दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळाली. आयर्लंडला थेट पात्रता मिळवण्यासाठी ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकणे गरजेचे होते. आता स्पर्धेतील अखेरचे दोन संघ ठरवण्यासाठी जून-जुलै महिन्यात पात्रता फेरी खेळवली जाईल.
https://www.instagram.com/p/CsCC0dBAwjr/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
आयर्लंड आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेशला आधीच विश्वचषकासाठी जागा मिळाली असल्याने ही मालिका आयर्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. या मालिकेत 3-0 असा विजय मिळवल्यानंतर आयर्लंड संघाला विश्वचषकात थेट पात्र ठरण्याची संधी होती. मात्र, पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने आयर्लंडच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा धावफलकावर लावल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना आयर्लंडने 65 धावांवर तीन गडी गमावले असता पाऊस सुरू झाला. त्यानंतर मैदान खेळासाठी योग्य नसल्याचे कारण देत सामना रद्द केला गेला.
यानंतर आता विश्वचषकासाठी आठ संघ थेट पात्र ठरले आहेत. यजमान भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अफगाणिस्तान व पाकिस्तान यांचा समावेश आहे. जून जुलै महिन्यात होणाऱ्या पात्रता फेरीत वेस्टइंडीज, श्रीलंका व आयर्लंड यांच्यापैकी कोणते संघ थेट पात्रता मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
बातमी अपडेट होत आहे
(South Africa Direct Qualify For 2023 ODI World Cup After Ireland Bangladesh ODI Cancel)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेत चमकला मुंबईचा ‘सूर्य’, 83 धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर रचला ‘हा’ जबरदस्त विक्रम, वाचाच
आयपीएलमधील रोहितचा सर्वात वाईट काळ! मागच्या पाच इनिंग्ज विसरलेल्याच बऱ्या