टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना चौथ्याच दिवशी जिंकला आहे. तसेच टीम इंडियाने इंग्लंडवर धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा 122 धावांवर ऑलआऊट झाला आहे. टीम इंडियाने या सामन्यातील विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या 557 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या शेवटच्या 2 फलंदाजांचा अपवाद वगळता प्रत्येकाला सुरुवात मिळाली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकापर्यंत पोहचू दिलं नाही. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक ३३ धावा केल्या आहेत.
याबरोबरच, भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. रविंद्र जडेजाने शतकी खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावात संपवला. बेन डकेटने 153 धावांची धडाकेबाज खेली केली होती. त्यानंतर यशस्वी जैस्वालच्या 214 धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 430 धावा केल्या. इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे आव्हान ठेवले होते.
दरम्यान,भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत मालिकेत 2 -1 अशी आघाडी घेतली. भारताने 557 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावात गुंडाळला आहे. रविंद्र जडेजाने 5 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. तसेच अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –