भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन (Lakshya Sen) यांनी सय्यद मोदी इंटरनॅशनल 2024 (Syed Modi International) मध्ये त्यांच्या चमकदार कामगिरीने भारतीय बॅडमिंटनला नवीन उंचीवर नेले आहे. सिंधूने चीनच्या वू लुओ यू हिला पराभूत करून तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले, तर लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा पराभव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
रविवारी (1 डिसेंबर 2024) रोजी झालेल्या महिला एकेरीच्या फायनल सामन्यात, पीव्ही सिंधूने चमकदार कामगिरी केली आणि सरळ गेममध्ये 21-14, 21-16 असा विजय मिळवला. तिच्यासाठी हे जेतेपद खूप खास होते कारण तिने 2 वर्षे, 4 महिने आणि 18 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ही स्पर्धा जिंकली. सामन्यानंतर सिंधूने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केला आणि लिहिले, “2 वर्षे, 4 महिने आणि 18 दिवस. माझी टीम, माझा अभिमान.” सिंधूने तिचा संघ आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले आणि हा विजय तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या लक्ष्य सेनने (Lakshya Sen) सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा 21-6, 21-7 असा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. सेनने संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट नियंत्रण दाखवत प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही. पहिल्या गेममध्ये सेनने 8-0 अशी आघाडी घेतली आणि जेसन टि ओहच्या सलग चुकांचा फायदा घेत हा गेम 21-6 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्य सेनने ब्रेकमध्ये 10-1 अशी आघाडी घेतली आणि अखेरीस 21-7 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटने कर्णधार पदासाठी नकार दिल्यास, कोण असणार RCBचा कर्णधार?
क्रेग ब्रेथवेटने रचला इतिहास! ‘या’ दिग्गजाला टाकले मागे
VIDEO; शुबमन गिल, अभिषेक नायरने लावली पैज! कोणी मारली बाजी?