टी20 विश्वचषक 2024 मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. टीम इंडियानं हा सामना जिंकला असला तरी पाकिस्तानी गोलंदाजांनी भारतीय संघातील अनेक कमकुवत बाजू चहाट्यावर आणल्या आहेत. आता टीम इंडियाला ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्येच या उणीवा दूर कराव्या लागतील.
प्लेइंग इलेव्हनची निवड, फलंदाजी क्रम आणि इतर अनेक गोष्टी अशा आहेत, जिथे भारतीय संघानं चुका केल्या. आता येत्या सामन्यांमध्ये त्यांची पुनरावृत्ती करणं टीम इंडियाला परवडणारं नाही. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघात पुढील सामन्यांसाठी कोणते तीन मोठे बदल होऊ शकतात, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
(1) सलामीला विराट कोहली ऐवजी यशस्वी जयस्वाल
विराट कोहली आयपीएलमध्ये आरसीबीसाठी सलामीला येतो. या विश्वचषकात आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये तो सलामीला उतरला होता. मात्र आतापर्यंत हा निर्णय चुकीचा ठरला आहे. कोहली पाकिस्तानविरुद्ध केवळ 4 धावा करू शकला, तर आयर्लंडविरुद्धही तो फ्लॉप ठरला होता. अशा परिस्थितीत विराट ऐवजी यशस्वी जयस्वालला सलामीला संधी द्यावी आणि कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावर खेळायला यावं.
(2ा) शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात यावं
टीम मॅनेजमेंटनं आयपीएलचा फॉर्म पाहून शिवम दुबेवर विश्वास व्यक्त केला होता. मात्र तो आतापर्यंत या विश्वासाला खरा उतरू शकलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यानं 9 चेंडूंचा सामना करून केवळ 3 धावा केल्या. तसेच क्षेत्ररक्षण करतानाही त्यानं एक झेल सोडला. शिवम दुबेची भारतीय संघात निवड झाल्यापासून तो फ्लॉप ठरला आहे. अशा स्थितीत त्याला आता प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात यावं आणि त्याऐवजी यशस्वी जयस्वालला टीममध्ये घेण्यात यावं
(3) रवींद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादव
स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजालाही आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. एकंदरीत, त्यानं दोन सामन्यांत तीन षटकं टाकली आहेत. मात्र त्याला एकही बळी मिळाला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर तो फलंदाजीतही फ्लॉप ठरला. जडेजा क्रिजवर येताच पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अशा परिस्थितीत त्याच्या जागी विकेट घेणारा गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात हवी.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांना नामांकन, कोणाला मिळालं पदक?
टीम इंडियाच्या पाकिस्तानवरील थरारक विजयाचे 3 हिरो, एका खेळाडूचं नाव कोणाच्याच तोंडी नाही
पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल