ऑस्ट्रेलिया संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून उभय संघातील तिसरा कसोटी सामना बुधवारी (०३ मार्च) पार पडला. वेलिंग्टन येथे झालेल्या या सामन्यात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने धुव्वाधार फलंदाजी केली. मागील २ सामन्यात फ्लॉप ठरल्याने टीका होत असलेल्या मॅक्सवेलने २५ चेंडूत अर्धशतक झळकावत टीकाकारांची बोलती बंद केली. यादरम्यान त्याने इतका जबरदस्त षटकार मारला की स्टेडियममधील रिकाम्या खुर्चीला मोठे छिद्र पडले.
ग्लेन मॅक्सवेलच्या ३१ चेंडूत ७० धावा
नाणेफेकीचा निकाल यजमान न्यूझीलंडच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी पाहुण्या ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर मॅथ्यू वेड ५ धावांवर परतल्यानंतर कर्णधार ऍरॉन फिंच आणि जोश फिलीपने मिळून डाव सावरला. अखेर न्यूझीलंडचा गोलंदाज इश सोधीने ४३ धावांवर फिलीपला बाद करत त्यांची भागिदारी मोडली.
त्यानंतर मॅक्सवेलचे वादळ घोंगावले. संघाची धावसंख्या २ बाद ८९ इतकी असताना त्याने षटकार-चौकारांचा पाऊस पाडला. यामुळे अवघ्या ३१ चेंडूत ५ षटकार आणि ८ चौकार खेचत त्याने ७० धावांची अफलातून खेळी केली. या खेळीदरम्यान जिम्मी निशमच्या एका षटकात (१७ व्या षटकात) त्याने २८ धावा चोपल्या. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यातील त्याचा एक शॉट तर इतका खतरनाक होता की, चेंडूमुळे स्टेडियममधील एक खुर्ची तुटली.
यासह ऑस्ट्रेलियाकडून टी२० सामन्यातील एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात मॅक्सवेलने दुसरे स्थान पटकावले आहे. याआधी माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगने २००५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका षटकात ३० धावा करत प्रथमस्थानी विराजमान आहेत.
The last off Maxwell's five big sixes! #NZvAUS https://t.co/jIgeVr4t91
— cricket.com.au (@cricketcomau) March 3, 2021
Glenn Maxwell's entered demolition mode in Wellington! #NZvAUS pic.twitter.com/LEWlDFWW6R
— cricket.com.au (@cricketcomau) March 3, 2021
विशे म्हणजे, आयपीएल २०२१ पुर्वी मॅक्सवेलच्या दमदार फॉर्ममुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची चिंता मिटली आहे. आयपीएल २०२१ च्या लिलावात महागड्या ठरलेल्या खेळाडूंमध्ये मॅक्सवेलचा तिसरा क्रमांक लागतो. आरसीबीने या लिलावात त्याच्यासाठी १४.२५ कोटी रुपये मोजले आहेत. मागील हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून अपयशी ठरल्यानंतर त्यांनी मॅक्सवेलला संघातून मुक्त केले होते. त्यानंतर आरसीबीने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
“क्रिकेटपासून जरा लक्ष दुसरीकडे वळवा, तरच…”, कर्णधार जो रूटचा संघ सहकार्यांना सल्ला
‘या’ शहरात आयोजित व्हावे आयपीएलचे सामने, थेट मुख्यमंत्र्यांचीच बीसीसीआयला विनंती