दुबईमध्ये कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेची पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत भारताने दमदार सुरुवात केली आहे.
आत्तापर्यंत भारताचे खेळाडूही चांगलेच चमकले आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगानेही 23 जूनला झालेल्या केनिया विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
याबरोबरच रिशांकने काल 24 जूनला त्याच्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का दिला. त्याने दक्षिण कोरिया विरुद्ध अर्जेंटिना यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात इंग्रजीत समालोचन केले. याबद्दल त्याने ट्विटही केले आहे.
Once again with @manishbatavia in the commentary box! pic.twitter.com/GyUJ9BxUyE
— Rishank Devadiga (@RishankDevadiga) June 24, 2018
मोठ्या मोठ्या स्थरावर खेळलेल्या अनेक भारतीय कबड्डीपटूंमध्ये रिशांक उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी ओळखला जातो. त्याचे हे कौशल्य प्रेक्षकांनाही त्याने समालोचन केल्याने पहायला मिळाले.
अनेकदा कबड्डीपटू हे हिंदी किंवा त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये संवाद साधताना दिसतात. पण ते इंग्रजीत बोलताना क्वचितच पहायला मिळतात.
रिशांकला समालोचन करताना अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले. त्यावर रिशांक म्हणाला की दुबई कबड्डी मास्टर्स ही आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेम्सची रंगीत तालीम आहे.
तसेच भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने ते एशियन गेम्ससाठी प्रबळ दावेदारही आहेत, असाही दावा रिशांकने केला आहे.
याबरोबरच रिशांकने परदेशी खेळांडूमध्ये कोरियाचा जॅन्ग कुन ली हा त्याचा आवडता खेळाडू असल्याचे त्याने सांगितले आहे.
रिशांकला दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघात संधी देण्यात आली नव्हती. परंतू त्याला केनिया विरुद्ध संधी मिळाली. त्यानेही या संधीचा योग्य फायदा घेत या सामन्यात १५ चढाईमध्ये सर्वाधिक १३ गुण मिळवले.
त्यामध्ये त्याच्या एका सुपररेडचा समावेश होता. तसेच तो कबड्डी मास्टर्समध्ये भारताकडून सुपरटेन पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
रिशांक मागील काही महिन्यांपासुन त्याच्या कामगिरीत सातत्य राखून आहे. त्यामुळे यावर्षीच्या प्रो कबड्डीसाठी पार पडलेल्या लिलावात त्याला 1 कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळाली.
महत्तवाच्या बातम्या:
–कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताचा सलग दुसरा विजय, दुबईत रिशांक देवडिगा चमकला
–कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!