इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने १० सामने खेळले आहेत. त्यातील ३ सामने त्यांनी जिंकले आहेत. तर ७ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. मात्र भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठान याच्या मते, अजूनही चेन्नई संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.
याविषयी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना इरफान म्हणाला की, “आयपीएलच्या मध्यांतरानंतर गुणतक्यात ७व्या किंवा ८व्या क्रमांकावर असूनही टूर्नामेंटमध्ये पुनरागमन करु शकणारा संघ म्हणजे, चेन्नई सुपर किंग्स. त्यांना माहिती आहे की, संघातील स्टार खेळाडूंचा कसा योग्य वापर करुन घ्यायचा. मी आयपीएल २०१५मध्ये चेन्नईचा सदस्य होतो. त्यामुळे मला त्यांच्याविषयी बरीच माहिती आहे.”
“आपणा सर्वांना माहिती आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून चेन्नई संघ दमदार प्रदर्शन करत आहे. यावर्षी संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या गैरहजेरीमुळे संघाला नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. याव्यतिरिक्त त्यांचे काही खेळाडू जखमी झाले. तरीही मला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, कारण चेन्नईकडे धोनीसारखा कर्णधार उपलब्ध आहे. तो नक्कीच संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकतो,” असे शेवटी इरफानने म्हटले
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला खेळाडूंना पुन्हा…’, सततच्या पराभवानंतरही संघात बदल न करण्याबाबत धोनीचे मोठे वक्तव्य
क्रिकेटमधील राजा माणूस! राजस्थानचा हुकमी एक्का जॉस बटलरला धोनीकडून खास भेट
…म्हणून बटलरला मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठवले, स्टीव्ह स्मिथने सांगितले कारण
ट्रेंडिंग लेख-
५ अशा घटना, जेव्हा मुलतानचा सुलतान सेहवाग थेट नडलाय पाकिस्तानच्या क्रिकेटर्सला
सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…