आयपीएलमध्ये सोमवारी (19 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फलंदाज जॉस बटलरने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दमदार फलंदाजी केली. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने त्याला फलंदाजीसाठी मधल्या फळीत पाठवले. अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स हे दोघेही सलामीला आले होते. बटलरला मधल्या फळीत पाठवण्याचे मोठे कारण कर्णधार स्टीव्ह स्मिथने सांगितले आहे.
बटलर मधल्या फळीत खेळल्याने संघ अधिक संतुलित आहे, असे स्मिथने सांगितले. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि बटलर यांनी चौथ्या गड्यासाठी 98 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. त्यांचा या भागीदारीमुळेच संघाला विजय मिळवता आला.
बटलरला फलंदाजीसाठी दिली अधिक संधी
सामन्यानंतर बोलताना स्मिथ म्हणाला, “बटलरला मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठवले. कारण त्यामुळे संघ अधिक संतुलित वाटला. मला माहित होते की जर मी बटलरबरोबर फलंदाजी केली, तर तो चांगल्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करेल. त्याने उत्तम फटके मारले. या भागीदारीदरम्यान मी त्याला फलंदाजीसाठी अधिक संधी देत होतो.”
“आम्ही केवळ 125 धावांचा पाठलाग करीत होतो. त्यामुळे मोठे फटके खेळण्याची गरज नव्हती. एक मोठ्या भागीदारीची संघाला आवश्यकता होती आणि या भागीदारीमुळे आमचे कार्य सुलभ झाले. या विजयानंतर मिळालेल्या दोन गुणांमुळे आम्ही आनंदी आहोत,” असेही तो पुढे म्हणाला.
चेन्नईचा होता सातवा पराभव
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला सात गडी राखून पराभूत केले. चेन्नईचा 10 सामन्यांमधील हा सातवा पराभव असून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने 20 षटकांत 125 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानने 18 व्या षटकांत 126 धावा करत विजय मिळवला.
जॉस बटलरने केली उत्कृष्ट खेळी
या सामन्यात जॉस बटलरची कामगिरी चांगली होती आणि 48 चेंडूत 70 धावा केल्या तरीही तो नाबाद राहिला. त्याच्या या फलंदाजीचा परिणाम असा झाला की राजस्थानने सहज विजय मिळविला.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नईविरुद्धच्या झुंजारू खेळीदरम्यान बटलरने केला खास विक्रम; रहाणे, वॉटसननंतर ठरला तिसरा फलंदाज
-‘ही माझी शेवटची संधी…’, चेन्नईविरुद्ध केलेल्या दमदार खेळीनंतर बटलरची प्रतिक्रिया
-‘करो या मरो’ सामन्यात राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ, प्लेऑफच्या आशा पल्लवित
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’