मुंबई । मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या कोचिंग सेट-अपमध्ये बदल केले आहेत. काही नव्या खेळाडूंना संघात देखील समाविष्ट केले आहे, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांना दिनेश कार्तिकच्या नेतृत्वावर विश्वास आहे. संघाचा मागील आयपीएल हंगाम फारच खराब होता. कार्तिकला सर्वोत्कृष्ट टी20 कर्णधार गौतम गंभीरनंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. कार्तिकसाठी ही दुसरी संधी असेल आणि यावेळीही संघाची कामगिरी खराब झाली, तर त्याला कदाचित आणखी एक संधी मिळणार नाही.
मागील हंगामात पहिल्या पाचपैकी चार सामने जिंकल्यानंतर संघाने सलग सहा सामने गमावले आणि क्वालिफायरमध्ये जाण्याची संधी गमावली. जमैकाचा स्टार अष्टपैलू गोलंदाज आंद्रे रसेलने कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) कडून खेळताना, मागील दोन हंगामात आपली उत्कृष्ट कामगिरी केली. त्याला 2019 मध्ये ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ म्हणून निवडले गेले होते.
रसेलने 56.66 च्या सरासरीने 510 धावा काढल्या. तसेच त्याने सर्वात जास्त (11) विकेट्स घेतल्या होत्या. परंतु काही वेळा रसेल डगआऊटमध्ये पॅड बांधून निराश चेहर्याने बसलेला दिसला. कारण त्याला संघाला विजय मिळवून देण्यासाठी जास्त चेंडू खेळायला मिळाले नाहीत.
संघात निवड करण्यात येणार्या पहिल्या चार विदेशी खेळाडूंपैकी तीन खेळाडू रसेल, सुनील नरेन आणि पॅट कमिन्स असण्याची शक्यता आहे. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा वनडे संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गन किंवा त्याचा संघ साथीदार टॉम बँटन याची निवड होऊ शकेल. रसेल तिसर्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे आणि त्यात मॉर्गनचा समावेश केल्याने तो मुक्तपणे खेळू शकतो.
जर मॉर्गन खेळला तर तो कर्णधार कार्तिकला मधल्या फळीत मदत करू शकेल. यापूर्वीच्या हंगामात त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला मिळाल्यामुळे नव्या दमाचा स्टार खेळाडू शुबमन गिलला, त्याच्या पसंतीच्या सलामीच्या जागी खेळता येऊ शकेल. मागील वर्षी त्याच्या फलंदाजीचा क्रम सतत बदलण्यात येत होता. या निर्णयावरही जोरदार टीका केली गेली होती.
डावाची सुरूवात करण्यासाठी त्याच्यासोबत सुनील नरेन किंवा बँटन असू शकतात. यानंतर, संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार पॅट कमिन्स करेल, जो संघाचा एक अतिशय मजबूत पैलू आहे. यावेळी कार्तिकला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू भेटले आहेत. 2019 च्या इंग्लंड विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार मॉर्गन त्याच्यासह उपकर्णधार म्हणून असेल, तर न्यूझीलंडचा महान खेळाडू ब्रँडन मॅक्यूलम हा मुख्य प्रशिक्षक आहे.
आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू (15.5 कोटी रुपये) पॅट कमिन्स व्यतिरिक्त या संघात लॉकी फर्ग्युसन, प्रतिभावान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, संदीप वॉरियर आहेत. केकेआरचा संघ या गोलंदाजांसह कशी कामगिरी करतो हे औत्सुक्याचा विषय आहे. युएई मधील खेळपट्ट्या सहसा मंद असतात, तेथे फिरकी विभाग केकेआरसाठी सर्वात मोठी चिंता असेल. एम सिद्धार्थ आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे अनुभव नसल्यामुळे केवळ सुनील नारायण आणि कुलदीप यादव यांच्यावर जास्त अवलंबून रहावे लागेल. केकेआर त्यांचा पहिला सामना 23 सप्टेंबर रोजी अबूधाबीमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळणार आहेत.
केकेआर संघ पुढीलप्रमाणे-
दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इयन मॉर्गन (उपकर्णधार), शुभमन गिल, टॉम बेंटन, सुनील नरेन, आंद्रे रसेल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, रिंकू सिंग, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, निखिल नायक, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, संदीप वॉरियर, वरुण चक्रवर्ती आणि सिद्धेश लाड.
महत्त्वाच्या बातम्या-
-स्वतः गोलंदाजानेच केले कबूल; ‘विराट जेव्हा मला पाहिल, तेव्हा माझी गोलंदाजी…’
-हिटमॅन रोहित शर्माने दिले संकेत; हा खेळाडू लवकरच खेळू शकतो टीम इंडियाकडून
-दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार जिममध्ये घेतायेत मेहनत; फोटो केले शेअर…
ट्रेंडिंग लेख-
-फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास प्लेअिंग ११
-सहाव्या क्रमांकाचा फलंदाज सलामीवीर बनला आणि इतिहास घडवला
-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!