fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतः गोलंदाजानेच केले कबूल; ‘विराट जेव्हा मला पाहिल, तेव्हा माझी गोलंदाजी…’

September 15, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


मुंबई । वेस्ट इंडिजचा गोलंदाज केसरिक विल्यम्स आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात क्रिकेट मैदानावर एक रोमांचक लढाई पाहायला मिळाली. 2017 मध्ये, विल्यम्सने विराटला बाद करून ‘नोटबुक’ स्टाईलने आनंद साजरा केला. विराट असा क्रिकेटपटू आहे जो त्याच्या बॅटने विरोधी गोलंदाजाला कसे उत्तर द्यायचे हे त्याला माहित आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2019 च्या देशांतर्गत मालिकेमध्ये विराटने विल्यम्सच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि  ‘नोटबुक’ स्टाईलने आनंद साजरा केला. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात ‘अनसोल्ड’ राहिलेला विल्यम्स विराटविरुद्ध खेळण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. एवढेच नव्हे तर विराटला पुन्हा एकदा बाद करेल, असा विश्वासही त्याला आहे.

फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत विल्यम्सला असे विचारले की, “विराटला गोलंदाजी करणे कठीण आहे का?” यावर प्रत्युत्तर देत तो म्हणाला, “नाही. असे नाही. तो एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे, एक उत्तम खेळाडू आहे. परंतु मला त्याची चिंता नाही. जेव्हा मी झोपायला जातो, तेव्हा मी हा विचार करतो की अरे तो विराट आहे! नाही बिलकुल नाही.”

विराटविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यासाठी तो तयार आहे का? असे विचारले असता तो म्हणाला की, “मी नक्की त्याची प्रतीक्षा करीत आहे. मला माहित आहे की, जेव्हा जेव्हा तो मला पाहील, तेव्हा तो उत्साहाने भरुन जात असेल आणि विचार करेल की याची गोलंदाजी चांगली धुवून काढायची. परंतु क्रिकेट हे क्रिकेट आहे, एखाद्याला बाहेर काढण्यासाठी एक बॉल लागतो आणि मी पुन्हा ते करीन.”

विल्यम्सने सांगितले की, विराट बाद झाल्यावर तो आता नव्या पद्धतीने आनंद साजरा करेल. तो पुढे म्हणाला, “मला विराटविरुद्ध खेळणे आवडते, तो खूप आक्रमक खेळाडू आहे. आक्रमक खेळाडूंविरूद्ध खेळण्याचा मला आनंद आहे, कारण त्यांच्या विरुद्ध मी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. मी यापूर्वीच सांगितले की, तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. जर मी कधी भारताविरुद्ध खेळलो, तर तो त्याच्या संघासाठी आणि मी माझ्या संघासाठी उत्तम कामगिरी करेन.”

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार जिममध्ये घेतायेत मेहनत; फोटो केले शेअर…

-टीम इंडियाच्या या खेळाडूच्या पत्नीला हवीय सुरक्षा, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका…

-आरसीबीच्या ‘या’ फिरकीपटूला करायची आहे, अंतिम षटकात गोलंदाजी, कारण जाणून थक्क व्हाल…

ट्रेंडिंग लेख-

-सहाव्या क्रमांकाचा फलंदाज सलामीवीर बनला आणि इतिहास घडवला

-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान

-किंग्ज ११ पंजाब संघाला विजेतेपद जिंकून देण्याची क्षमता ठेवणारे ३ शिलेदार


Previous Post

हिटमॅन रोहित शर्माने दिले संकेत; हा खेळाडू लवकरच खेळू शकतो टीम इंडियाकडून

Next Post

फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास प्लेअिंग ११

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCIdomestic
क्रिकेट

महिपाल लोमरोलच्या विस्फोटक खेळीमुळे राजस्थानची बिहारचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक

January 28, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

आयपीएल लिलावात सहभागी होण्याआधी संघसदस्यांना ‘ही’ गोष्ट करणे अनिवार्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम; विराट व रोहित आहेत ‘या’ क्रमांकावर

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/Sunrisers
क्रिकेट

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

January 28, 2021
Next Post

फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास प्लेअिंग ११

Photo Courtesy: Twitter/ ICC

विश्वचषकात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघावर असा विश्वास पुर्वी कुणी दाखवला नसेल...

वयाची तिशी पुर्ण केलेला मुंबईकर लढतोय टीम इंडियाकडून एक सामना खेळण्यासाठी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.