भारतीय क्रिकेट संघाला मागील काही काळात महान खेळाडू मिळाले आहेत. या खेळाडूंबद्दल बोललं तर माजी कर्णधार एमएस धोनीने त्यांच्या यशामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. धोनीने भारताचे नेतृत्व करताना अनेक खेळाडू तयार केले. ज्यामध्ये बरीच मोठी नावे आहेत, ज्यांना आज भारतीय क्रिकेटचा अभिमान म्हणता येईल.
धोनीच्या नेतृत्वाखाली आर अश्विन, सुरेश रैना, रवींद्र जडेजा याशिवाय अनेक खेळाडू आहेत, जे स्वत: च्या यशाचे श्रेय धोनीला देतात.
आयपीएलमध्ये धोनीने विशेषतः चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना अनेक खेळाडूंना तयार केले आहे. यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरचेही नाव घेतले जाऊ शकते.
दीपक चाहरने पहिल्याच रणजी सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती. तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही सातत्याने खेळत होता, परंतु चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याला खरी ओळख मिळाली. चाहर २०१८ पासून सीएसकेचा भाग झाला आहे.
यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीवरही कठोर परिश्रम घेतले आणि धोनीच्या मदतीने यशाची वाटचाल सुरू केली. एका मुलाखतीत चाहरने सांगितले की, “स्वतः धोनीने मला अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी तयार केले आहे.”
चाहर आकाश चोप्राशी बोलताना म्हणाला की, “मी गोलंदाजी प्रशिक्षकाला बर्याच वेळा विचारले. तो म्हणाला की, मला अंतिम षटकांत गोलंदाजी करायला हवी. शेवटी मी थोडेसे धाडस केले आणि एका खोलीत बसलेल्या माही भाईला विचारायला गेलो. त्याने मला दोन शब्दांत उत्तर दिले की, मी खेळाडूंना प्राधान्य देतो. तो पुढे काहीच बोलला नाही. मी एकदम शांत झालो होतो.”
यानंतर चाहर म्हणाला की, “मला वाटते धोनी त्या लोकांना पसंत करतो, जे सर्व विभागांमध्ये चांगले आहेत. त्याला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान देऊ शकणारे खेळाडू आवडतात. एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब असू शकतो, परंतु तो एकदा चांगला झेल पकडून सामना बदलू शकतो, किंवा एखादा षटकार, चौकार मारून विजय मिळवून देऊ शकतो. ”
पुढे तो म्हणाला की, “जर तुम्ही आमच्या संघाकडे पाहिले, तर आमच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत जे प्रत्येक विभागात चांगले आहेत. टी२० हे स्वरूप अस आहे, ज्यामध्ये आपल्याला सर्वकाही करणे आवश्यक असतं. आयपीएलमध्ये बरेच संघ आहेत ज्यांच्याकडे फलंदाजी किंवा गोलंदाजीच जोरदार आक्रमक आहे. परंतु ते काही खेळाडूंवर अवलंबून आहेत. जर त्यांनी चांगली कामगिरी केली तरच ते जिंकतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
-अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले
-आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला…
-काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय
ट्रेंडिंग लेख-
-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी